Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे गेले तीन आठवडे चांगलेच गाजले. या घरामध्ये प्रत्येक क्षणी नाती बदलताना दिसतात. प्रेक्षकांसाठीही हे काही नवं नाही. पण या नव्या सीझनमध्ये तर पहिल्या दिवसापासूनच सदस्यांनी एकमेकांवर आरडाओरड करायला सुरुवात केली. गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने घरातील काही स्पर्धकांना चांगलीच समज दिली. यानंतर स्पर्धकांमध्ये थोडातरी बदल होईल अशी अपेक्षा होती. मात्र इतकं सगळं घडूनही घरातील परिस्थिती जैसे थे आहे. जान्हवीने पॅडी कांबळेचा अपमान केल्यानंतर आता निक्कीने इरिनाला रागाच्या भरात नको तेच बोलून गेली आहे. पुन्हा खासगी आयुष्यावरुन निक्कीने तिच्या टिपणी केली आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
इरिना निक्की-जान्हवीच्या टीमबरोबरच बऱ्याचदा बसलेली दिसते. वैभवबरोबर तिचं खास नातं सगळ्यांनीच पाहिलं. निक्कीही तिच्याशी पहिल्या दिवसापासूनच अगदी उत्तमरित्या संवाद साधत होती. मात्र आता निक्की-इरिनामध्येच बिनसलं आहे. इरिना निक्कीशी बोलायला गेली असता दोघींमध्ये मोठा वाद झाला. याचीच एक झलक पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नव्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये निक्की तिच्यावर आवाज चढवून बोलताना दिसत आहे. तसेच चुकीच्या शब्दांमध्ये इरिनाशी वाद घालत आहे.
इरिना निक्कीला म्हणते, “मी तुझ्या पाठीमागे या घरात अजूनही काहीच बोलले नाही”. यावर निक्की म्हणते, “या घरात मी तुझ्या पद्धतीने का वागू?”. यावरच इरिना भडकून उत्तर देते की, “मग जा आणि माझ्या मागून अजून चुगल्या कर”. हे ऐकल्यानंतर निक्कीचा स्वतःवर ताबा राहत नाही. निक्की म्हणते, “विकून खाशील सगळ्यांना त्यामधली आहेस तू. भरपूर चालू आहे. मला बोलते तुला रिजेक्ट केलं. पण हिला तिथे रिजेक्ट केलं म्हणून ती आपल्या देशात या शोमध्ये आली आहे”.
निक्की व इरिनाचा हा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनीही संताप व्यक्त केला आहे. निक्कीच्या विरोधात अनेक कमेंट केल्या आहेत. तर मराठी संस्कृती निक्की पेक्षा इरिनालाच अधिक कळते असे अनेकांनी म्हटलं आहे. आता या दोघींमधला हा वाद नक्की कशासाठी होता?, नेमकं घरात काय घडलं? हे आजच्या भागात बघायला मिळणार आहे. पण त्याचबरोबरीने वैभव नेहमीप्रमाणे इरिनाच्या बाजूने बोलणार का? हे पाहणंही रंजक ठरेलं.