मराठी मनोरंजन क्षेत्रातील सुरुची अडारकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर अनेक मालिकांमध्ये काम करुन आपलं एक वेगळं अस्तित्त्व निर्माण केले आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळताना दिसून येते. काही माहिन्यांपूर्वी ती सहकलाकार पीयूष रानडेबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांच्याही लग्नामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. त्यांचे लग्नाचेदेखील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघंही अनेक सणही साजरे करताना दिसतात. दोघांचे एकत्रित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसतात. (suruchi adarkar first manglagaur)
लग्नानंतर सुरुचीची पहिली मंगळागौर आहे. ती कुटुंबासमवेत मंगळागौर साजरी करताना दिसत आहे. अशातच आता तिचे मंगळागौरचे फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये ती पारंपरिक लूकमध्ये दिसून येत आहे. तिच्या साध्या व सालस लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गुलाबी रंगाच्या काठपदरी साडी, नाकात नथ, बाजूबंद व हिरव्या रंगाच्या बांगड्या यामुळे सुरुची अधिक सुंदर दिसत आहे.
पूजेच्या वेळी तिने सर्वात आधी तिने अन्नपूर्णा मातेची पूजा केली. ही पूजा अत्यंत साधेपणाने आणि घरीच पार पडली. यावेळी तिची खास मैत्रीण अर्चना निपाणकरदेखील उपस्थित होती. तिच्याबरोबर सुरुचीने मस्त पोज देत एक फोटो शेअर केला आहे. याचबरोबर तिने नवरा पीयूषबरोबरदेखील एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी अधिक पसंती दर्शवली आहे. सुरुचीची ही मंगळागौर थाटात पार पडली असून तिने आपला आनंददेखील व्यक्त केला आहे.
दरम्यान सुरुचीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर सध्या ती अभिनयक्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळते. मात्र याआधी ती ‘का रे दुरावा’, डॉ. अंजली – झेप स्वप्नांची’ , ‘एक घर मंतरलेलं’ अशा मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘डॉ. अंजली…’ या मालिकेदरम्यान पीयूष व सुरुचीची ओळख झाली होती. त्यावेळी त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकले.