शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Aarti Solanki : “तीन अफेअर्स होते पण…”; आरती सोळंकीचा लव्ह लाईफबद्दल खुलासा, म्हणाली, “एक इंडस्ट्रीमधीलच मुलगा होता पण…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 4, 2023 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aarti Solanki majjacha adda in Marathi

आरती सोलंकी मज्जाचा अड्डा

Aarti Solanki Video : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आरती सोळंकी सध्या तिच्या फॅट तू फिट जर्नीमुळे चर्चेत आलेली आहे. आरतीने गेली अनेक वर्ष विविध मालिका, चित्रपट व कार्यक्रमांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. केवळ विनोदी अभिनेत्री नव्हे, तर उत्तम नर्तिका म्हणूनही तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र तिचा हा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिने अनेक खडतर प्रवास पार करत आपल्या अभिनय कौशल्याचा डंका सर्वत्र वाजवला. मात्र आरती काही काळासाठी या विश्वातून दूर गेली होती. पुढे तिने तब्बल ५० किलो वजन घाटावले होते, ज्यामुळे बरीच चर्चेत आली होती. या मोठ्या गॅपनंतर आता ती या विश्वात परतण्यासाठी सज्ज झालेली आहे. (Aarti Solanki shares her Love life)

‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” कार्यक्रमात आरतीने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तिच्या मनोरंजन विश्वातील अनुभवाबद्दल बोलताना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे शेअर केले. आरतीला तिच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले होते. मात्र, तिने या परिस्थितीवर मोठ्या धैर्याने मात दिली. यावेळी अभिनेत्री तिच्या लव्ह लाईफबद्दल मन मोकळेपणाने बोलताना अनेक खुलासे केले आहे. आरतीच्या आयुष्यात तीन मुलांची एन्ट्री झाली होती. त्याबद्दलचे किस्से सांगताना ती म्हणाली, “आतापर्यंत माझी तीन अफेअर्स होते. खरंतर मी मनोरंजन क्षेत्रात आले, ते या अफेअरमुळेच. ते माझं पहिलं अफेअर. मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेले आणि तिथे मला एक मुलगा आवडायला लागला होता. कारण मी जेव्हा कॉलेजला जायचे, तेव्हाच ठरलेलं होतं की, ‘कॉलेजचा रुल आहे, एक बॉयफ्रेंड असलाच पाहिजे.'”

“मला जो मुलगा आवडायचा, त्याला एकांकिका करण्याचं प्रचंड वेड होतं. एकदा असं झालं की, एका सिनिअर मुलाने आयएनटी एकांकिका स्पर्धेच्या शिबिराची माहिती दिली. आणि कोण कोण यात उत्सुक आहे, असं सांगितलं. मुळात मला हात वर करण्याची इच्छा नव्हती. पण त्याने हात वर केला, म्हणून मी ही हात वर केले. मी म्हटलं चला, किमान यानिमित्ताने तरी आम्ही एकत्र असू. त्या मुलाच्या नादाने मी या शिबिरात सहभागी झाले. पुढे शिबिर वगैरे झालं, सिलेक्शन झालं. पण त्या एकांकिकेत त्याच्याऐवजी मला संधी मिळाली. आणि तो त्या बॅकस्टेजमध्ये होता. पण त्या शिबीरानंतरच आमच्या मैत्रीला सुरुवात झाली.”, असं ती म्हणाली.

हे देखील वाचा – चॅनलने बॅन केलं, कलाकारांनी मिळून त्रास दिला अन्…; आरती सोळंकीचा पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्याबद्दल वाईट…”

View this post on Instagram

A post shared by Aartii Solankii (@aartiisolankii)

या एकांकिकेनंतर आम्ही दोघं बोलायला लागलो होतो, पण एका फालतू कारणामुळे आमचं ब्रेकअप झालं असल्याचं सांगताना ती म्हणाली, “तर झालं असं की, आमचा एक ग्रुप होता. त्यांच्यासह मी हौशी एकांकिका स्पर्धा करायचे. खरंतर मला यात काही रस नव्हता. पण त्याच्याबरोबर राहता येईल, म्हणून मी एकांकिका करायचे. तर आम्ही एक एकांकिका करून दादरजवळील एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर आलो. तिथे मी एक पदार्थ ऑर्डर केला. त्या पदार्थाचं नाव ऐकून तो आश्चर्यचकित झाला. आणि मला म्हणाला की, मुलगी असून पण तू हा पदार्थ मागवते. ही डिश कशी काय मागू शकते तू? मी म्हटलं, मला माहित नाही काय आहे ते. पण मुलगी असून सुद्धा या डिशचा काय संबंध? पुढे मी तो पदार्थ खाल्ल्यानंतर त्याने मला या पदार्थाबद्दल सांगितलं. त्यावरून आमच्यात जोरदार भांडणं झाली आणि आमचं ब्रेकअप झालं.”

हे देखील वाचा – Aarti Solanki : “वडिलांचं पहिलं लग्न झालेलं आईला माहितच नव्हतं अन्…”, आरती सोळंकीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाली, “धर्मामुळे दोघांना…”

पुढे तिच्या काही अफेअरबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझं दुसरं अफेअर आपल्या इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर होतं. मात्र, त्याच्या स्वभावामुळे मीच स्वतःहून त्याच्यापासून लांब राहिले. मात्र तिसरं जे अफेअर होतं, ते खूपच छान असल्याचं मी म्हणेन. तो खूप चांगला मुलगा होता. त्याच्यात समजूतदारपणा दिसायचा. पण स्टेटस जेव्हा समोर येतं, तेव्हा ते प्रेम असून पण चालत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र असतो, ते वेगळं आणि समाजात जेव्हा वावरतो, ते पूर्णपणे वेगळं निघतं. त्यामुळे स्टेटसमध्ये येणारा जो दुरावा असतो तो खूप वेगळा असतो.” याच कारणामुळे मी त्या मुलाला नाही म्हटले आणि आमचं हे नातंदेखील संपुष्टात आल्याचं ती यावेळी म्हणाली. आरती सोळंकीने तिच्या लव्ह लाईफबद्दल मन मोकळेपणाने बोलताना सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर स्पष्ट भाष्य केलं आहे.

Tags: aarti solankiaarti solanki majjacha addaAarti Solanki shares her Love lifeits majja exclusivemajjacha adda
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Prasad Oak shares funny Video

"बायको हे प्रकरण खूप…", प्रसाद ओकने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर कलाकारांच्या कमेंट्सचा पाऊस, बायको म्हणते, "तुझ्या बोलण्यामध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.