लोकप्रिय मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमीच त्याच्या कुटुंबाचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. स्वप्नील जोशी हा आपल्या दमदार अभिनयासाठी व हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. स्वप्निल जोशी हा इंस्टाग्रामवरही सक्रिय असतो. तो चाहत्यांना आपले रोजचे नवे अपडेट्सही पुरवत असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने शेअर केलेली ही पोस्ट स्वप्नीलसाठी खास असल्याचं त्याने म्हटलं आहे. (Swapnil Joshi Daughter)
स्वप्नीलचा अभिनयक्षेत्रातला वावर बऱ्यापैकी मोठा आहे. तो चित्रपटांच्या चित्रीकरणात खूप व्यस्त असतो. असं असलं तरी यातून तो वेळात वेळ काढून त्याच्या कुटुंबाला वेळ देताना तो हमखास दिसतो. कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ तो चाहत्यांसह शेअर करतो. यांत स्वप्निलच्या दोन्ही मुलांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मायरा व राघवचे तो अनेक फोटोस शेअर करत असतो. मायरासह स्वप्नीलचं खास बॉण्डिंग आहे. सोशल मीडियावर हे बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं.
अशातच स्वप्नीलने त्याच्या खास व्यक्तीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यांत स्वप्नील त्याच्या लेकीसह डेटवर गेला आहे. लेकीबरोबरची स्पेशल डेट व्हिडीओ त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. यांत स्वप्नील व मायरा दिसत असून ते दोघे डेटवर गेल्याचं कळत आहे. बाप लेक बाहेर फिरायला गेले असून दोघांनी खूप धमाल मस्ती केलेली या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मायराबरोबरचं हा व्हिडीओ शेअर करत स्वप्नील म्हणाला आहे की, “लेकीसह डेटनाईट. तिने तिच्या शाळेत मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये बक्षीस जिंकले आणि मी तिला डेटसाठी घेऊन आलो” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
स्वप्निलच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत बापलेकीचं कौतुक केलं आहे. तर अनेक कलाकारांनीही कमेंट करत मायरावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.