बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्पेशल दिवस, केक, सेल्फी अन्…”, स्वप्नील जोशीची लेकीसह स्पेशल डेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तिने जिंकलं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 23, 2023 | 1:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swapnil Joshi Daughter

"स्पेशल दिवस, केक, सेल्फी अन्…", स्वप्नील जोशीची लेकीसह स्पेशल डेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "तिने जिंकलं…"

लोकप्रिय मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमीच त्याच्या कुटुंबाचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. स्वप्नील जोशी हा आपल्या दमदार अभिनयासाठी व हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. स्वप्निल जोशी हा इंस्टाग्रामवरही सक्रिय असतो. तो चाहत्यांना आपले रोजचे नवे अपडेट्सही पुरवत असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने शेअर केलेली ही पोस्ट स्वप्नीलसाठी खास असल्याचं त्याने म्हटलं आहे. (Swapnil Joshi Daughter)

स्वप्नीलचा अभिनयक्षेत्रातला वावर बऱ्यापैकी मोठा आहे. तो चित्रपटांच्या चित्रीकरणात खूप व्यस्त असतो. असं असलं तरी यातून तो वेळात वेळ काढून त्याच्या कुटुंबाला वेळ देताना तो हमखास दिसतो. कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ तो चाहत्यांसह शेअर करतो. यांत स्वप्निलच्या दोन्ही मुलांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मायरा व राघवचे तो अनेक फोटोस शेअर करत असतो. मायरासह स्वप्नीलचं खास बॉण्डिंग आहे. सोशल मीडियावर हे बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं.

आणखी वाचा – राहुल देशपांडेच्या लेकीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलं खास सरप्राईज, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला, “तिने स्वतःच्या हाताने…”

View this post on Instagram

A post shared by स्वप्नील जोशी (@swwapnil_joshi)

अशातच स्वप्नीलने त्याच्या खास व्यक्तीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यांत स्वप्नील त्याच्या लेकीसह डेटवर गेला आहे. लेकीबरोबरची स्पेशल डेट व्हिडीओ त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. यांत स्वप्नील व मायरा दिसत असून ते दोघे डेटवर गेल्याचं कळत आहे. बाप लेक बाहेर फिरायला गेले असून दोघांनी खूप धमाल मस्ती केलेली या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मायराबरोबरचं हा व्हिडीओ शेअर करत स्वप्नील म्हणाला आहे की, “लेकीसह डेटनाईट. तिने तिच्या शाळेत मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये बक्षीस जिंकले आणि मी तिला डेटसाठी घेऊन आलो” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “दुसऱ्या देशात जाती जमाती…”, परदेशात पदवीधर झालेल्या प्रसाद ओकच्या लेकाला नेटकऱ्यांनी सुनावलं, मंजिरी भडकली, म्हणाली, “नजर लावू नका कारण…”

स्वप्निलच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत बापलेकीचं कौतुक केलं आहे. तर अनेक कलाकारांनीही कमेंट करत मायरावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Tags: entertainmentmaayramarathi actorswapnil joshiswapnil joshi childrenSwapnil Joshi Daughter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Next Post
kranti redkar daughter drew a gandhiji sketch

Video : क्रांती रेडकरच्या लेकींनी स्वतःच छापली ५० रुपयांची नोट, गांधीजींना पाहता नेटकऱ्यांनाही आलं हसू; म्हणाले, “RBIला ...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.