मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्याचबरोबर ती एक उत्तम नृत्यांगणाही आहे. तिने आजवर बऱ्याच हिट चित्रपटात काम केलं आहे. ‘जत्रा’, ‘खो–खो’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’ यांसारखे चित्रपट बरेच गाजले. क्रांतीने अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर तिने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. अशा विविध भूमिका साकारणाऱ्या क्रांतीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या लेकींचे विविध अतरंगी व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. आताही तिने लेकींच्या अतरंगी करामतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. (kranti redkar daughter drew a gandhiji sketch)
क्रांती लेकींच्या वेगवेगळ्या करामतींचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या लेकी नेहमी काहीतरी नवीन करत असतात. नवनव्या विषयांवर त्यांचे प्रयोग चालूच असतात. याअगोदर छबिलने तिचे स्वतःचे केस कापून घरटं बनवलं होतं. तो व्हिडीओ पण बराच व्हायरल झाला होता. आताही तिने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांतीच्या मुलीने घरीच तिचे स्वतःचे पैसे तयार केले आहेत. तिने वहीवर ५० रुपयांच्या नोटीचं चित्र काढलं. त्यावर गांधीजीही रेखाटले आहेत.
गांधीचं तिने काढलेलं चित्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर तिने ५० हा आकडा उलटा लिहीला आहे. त्याला पाहता ‘तारे जमीनपर’ हा आमिरचा चित्रपट एका क्षणाला डोळ्यासमोर उभा राहिला. सध्या क्रांतीच्या लेकीची करामत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांनीही कमेंट करत तिच्या या चित्रकलेचं विशेष कौतुक केलं आहे. एक नेटकरी लिहितो, ‘राज्य सरकारला विनंती आहे की हेच गांधींजी आम्हाला आमच्या सर्व नोटांवर हवे आहेत’. तर दुसरा नेटकरी लिहितो, ‘RBI ला टक्कर देणार का डोडो? आम्ही पण याच नोटा वापरणार’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘आज गांधीजी असते तर काय वाटलं असतं त्यांना?’, अशी कमेंट करत नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी शेअर केल्या आहेत. सध्या या व्हिडीओला सगळ्यांकडून बरीच पसंती मिळत आहे.