Paaru Serial New Entry : झी मराठी वाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. यापैकीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘पारू’. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘पारु’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना पाहायला मिळत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विटसमुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून नवनवीन ट्विस्ट येत असतानाच आता मालिकेत आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे. ती म्हणजे मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘पारु’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. (Paaru Serial Update)
या प्रोमोमध्ये अहिल्यादेवी आपल्या भावाला राखी पाठवताना दिसत आहे. ते पाहून श्रीकांत तिला तू आणखी किती दिवस अशी राखी पाठवणार? असे विचारताना दिसत आहे. त्याचवेळी अहिल्यादेवीच्या भावाची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवीच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून तो सुनील बर्वे आहे. प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे, अहिल्यादेवी आपल्या भावाला राखी पाठवताना दिसते. त्यावेळी श्रीकांत तिला तू अशाप्रकारे राखी आणखी किती दिवस पाठवणार, असे विचारतो. त्यावर अहिल्यादेवी, मला विश्वास आहे, एक ना एक दिवस त्याचा राग शांत होईल आणि तो मला माफ करेल”, असे म्हणते.
आणखी वाचा – घरी जाण्यासाठी योगिताचा Bigg Boss कडे हट्ट, शोमधील त्रास अभिनेत्रीला सहन होईना, एक्झिट घेणार का?
या प्रोमोमधून प्रिया आणि अहिल्यादेवीच्या भावाचा म्हणजेच सुनील बर्वे साकारत असलेल्या पात्राचा एकत्र फोटोही पाहायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना “रक्षाबंधन विशेष भाग,अहिल्या पाठवणार भावाला राखी, का दुरावलीत ही जुनी नाती, नियती बांधणार का भावा-बहिणीच्या तुटलेल्या नात्याची गाठ? असं कॅप्शन लिहिलेलं आहे. या नवीन एण्ट्रीमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे लवकरच अहिल्यादेवी आणि त्यांच्या भावाच्या नात्यात दुरावा का आला होता? तसेच पारु त्यांच्या नात्यात गेलेला तडा दूर करण्यास मदत करेल की नाही? हे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील एक एव्हरग्रीन अभिनेते म्हणून सुनील बर्वे यांची ओळख आहे. त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच आता ते पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे. याआधी ते ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसलेले. त्यानंतर आता ते झी मराठीवरील ‘पारू’ लोकप्रिय मालिकेतून पुनरागमन करत आहेत.