शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं लग्न, घटस्फोट न झाल्याचे माहित असूनही…”, दलजित कौरने केलेल्या आरोपांवर नवऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, “पहिल्या नवऱ्याबरोबर तिने…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 13, 2024 | 4:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
nikhil patel on dalljiet kaur

दलजित कौरच्या आरोपांवर निखिल पटेलने केलं भाष्य

अभिनेत्री दलजित कौर ही सध्या खूप चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता ती अभिनयामुळे नाही वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. ती निखिल पटेलबरोबर लग्नबंधनात अडकली होती. मात्र एका वर्षाच्या आतच दोघांमध्ये मतभेद सुरु झाले आणि त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णय घेतला. याबद्दल सोशल मीडियावर तसेच माध्यमामध्येही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. दलजितने नवऱ्यावर अनेक आरोपदेखील केले. त्यावर आता निखिल आपली बाजू स्पष्ट केली आहे. (nikhil patel on dalljiet kaur)

निखिलने सांगितले की, “दलजित व मी दुबईमध्ये २०२२ साली भेटलो. त्यानंतर आम्ही भारतातच हिंदू पद्धतिने लग्न केले. लग्नानंतर आम्ही नॉर्वेमध्ये गेलो. आम्ही केन्यामध्ये २०२४ पर्यंत अगदी कुटुंबाप्रमाणे एकत्र राहिलो. त्यानंतर दलजित मुलगा जेडनबरोबर भारतात परत आली”.

आणखी वाचा – Dinkar Shinde Passed Away : आनंद शिंदेंच्या भावाचं निधन, वर्षभरापूर्वीच लेकालाही गमावलं, शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, उत्कर्ष म्हणाला, “सार्थक गेला आणि…”

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

पुढे त्याने लिहिले की, “दलजितला केन्याला येऊन कुटुंबाबरोबर एकत्रित वेळ घालवायचा होता. त्यावेळी तिला माहीत होतं की माझी पहिली पत्नी व माझा कायदेशीर घटस्फोट झाला नव्हता. माझ्या वकिलांनी दलजितच्या आई-वडिलांना याबद्दल माहितीदेखील दिली होती. त्यानंतरही तिचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार झाले. त्यामुळे आम्ही गुरुद्वारा व मंदिरात लग्न न करता हिंदू पद्धतीने लग्न केलं. हे लग्न कायदेशीर पद्धतीने झाले नाही. यामुळे दलजित केन्यामध्ये सहज येऊ शकली. या वर्षी जानेवारीपर्यंत माझा घटस्फोट झाला नव्हता पण त्याआधीच दलजित केन्या सोडून भारतात निघून गेली होती”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : डीपी व इरीनाचं भांडण, पण उगाचच मध्ये आला वैभव, आरडाओरड आरोप करत वाद वाढवला अन्…; प्रेक्षकही संतापले

नंतर त्याने लिहिले की, “दलजित एका विवाहित पुरुषाबरोबर लग्न करत आहे हे तिला माहीत होतं. तरीही तिने माझ्यावर फसवणुकीचे आरोप केले. तसेच माझं बाहेर अफेअर सुरु आहे असंदेखील ती म्हणत आहे. २ ऑगस्टला माझा वाढदिवस असतो आणि त्याचदिवशी माझ्या विरोधात तक्रार केली. तिने माझ्याबरोबरही तेच केलं जे तिने तिच्या पहिल्या नवऱ्याबरोबर केलं होतं. तिने तक्रारीमध्ये चुकीचे आरोपदेखील केले आहेत”. दरम्यान आता दलजित व निखिल यांच्यामध्ये असलेले वाद कुठवर जातील याकडे तिच्या चाहत्यांची नजर आहे. तसेच यावर आता दलजित काय प्रतिक्रिया देणार हे पाहाण्यासारखे आहे.

Tags: Daljiet KaurNikhil patelofficial statement
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo Ghanshyam Darwade arguing with Ankita Valawalkar and Paddy Kamble

Bigg Boss Marathi : "याच्या दोन कानाखाली मारायची इच्छा झाली", छोटा पुढारीवर भडकली अंकिता, दोन्ही बाजूने बोलतो अन्…; डीपीही संतापला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.