शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र?”, कळसुबाई शिखरावरील कचऱ्याचा ढीग पाहून अभिनेता भडकला, म्हणाला, “शिवरायांचा महाराष्ट्र…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 31, 2025 | 4:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi actor sumeet raghvan

"कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र?", कळसुबाई शिखरावरील कचऱ्याचा ढीग पाहून अभिनेता भडकला, म्हणाला, "शिवरायांचा महाराष्ट्र..."

marathi actor sumeet raghvan : सामाजिक, राजकीय वा आशयघन मुद्द्यांवर कलाक्षेत्रातील मंडळी बरेचदा भाष्य करताना दिसतात. यामध्ये एका अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे सुमित राघवन. सुमित राघवनने आजवर अनेकदा सडेतोडपणे भाष्य केलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा सुमित यांनी सोशल मीडियावर एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. एक नागरिक म्हणून सुमित यांनी सोशल मीडियावर कळसुबाई शिखरावर कचरा असणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आजकाल जिकडे तिकडे कचरा असणाऱ्या अनेक व्हिडीओ त्रस्त नागरिक शेअर करताना दिसतात. काही विचित्र स्वभावाची माणसं हा कचरा करतात त्यामुळे हा नाहक त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो.

Sustainif Your Life या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेला कळसूबाई शिखरावरील कचऱ्याचा व्हिडीओ सुमित यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीत म्हणतो, “शरम वाटते. खरंच कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र?” पुढे तो म्हणतो, “एरव्ही ‘शिवरायांचा महाराष्ट्र’ म्हणून गळा काढणारा प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांच्या अनुयायांची अशा वेळी अस्मिता दुखावली जात नाही? घेईल का कोणी जबाबदारी? कठोर कारवाई होईल का? आपल्या ऐतिहासिक वास्तूंची आपण काळजी घेऊ शकतो का? हा प्रश्न जनतेलासुद्धा आहे”.

आणखी वाचा – काश्मीरमधील मुस्लिम दुकानदाराचा मराठीत संवाद, उत्कर्ष शिंदेने दाखविली झलक, म्हणाला, “इथे धंदा करा, पैसे कमवा पण…”

दरम्यान, Sustainif Your Life या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कळसूबाई शिखरावर सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. कचऱ्याच्या या व्हिडीओसह असं म्हटलं आहे, “महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर प्लास्टिकच्या विळख्यात! कळसूबाई हे पूर्वी निसर्गप्रेमींसाठी एक पवित्र ठिकाण मानलं जायचं. पण, आज तिथे चहाच्या कपांपासून पाण्याच्या बाटल्यांपर्यंत ते चिप्सच्या रिकाम्या पुड्यांपासून इतर कचऱ्यानं संपूर्ण परिसर भरून गेला आहे. ७०% पेक्षा जास्त ट्रेकर्स ट्रेकिंगदरम्यान प्लास्टिकसारख्या वस्तू वापरतात. पण, हा कचरा जातो तरी कुठे? ते सगळं परत डोंगरावरच फेकलं जातं”.

आणखी वाचा – खूप काम, आजारपण आणि…; ‘ठरलं तर…’च्या कोर्ट सीनसाठी अर्जुनने घेतली इतकी मेहनत, केस जिंकताच म्हणाला, “५० पानांचा…”

View this post on Instagram

A post shared by Sustainify | Magazine | Sustainable Solutions (@sustainifyyourlife)

कचऱ्यासंदर्भात सुमितने शेअर केलेली ही पोस्ट अनेकांना पटली आहे. सुमित यांच्याव्यतिरिक्त अनेक कलाकार मंडळीनीही परिसरात पसरलेल्या कचऱ्यासंदर्भात आवाज उठविला आहे.

Tags: Maharashtra social issuesmarathi actorsumeet raghvan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
prajakta gaikwad goodnews

प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! विधीदरम्यानचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, पण होणारा नवरा कोण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.