सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खूप काम, आजारपण आणि…; ‘ठरलं तर…’च्या कोर्ट सीनसाठी अर्जुनने घेतली इतकी मेहनत, केस जिंकताच म्हणाला, “५० पानांचा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 31, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharala Tar Mag

खूप काम, आजारपण आणि…; 'ठरलं तर…'च्या कोर्ट सीनसाठी अर्जुनने घेतली इतकी मेहनत, केस जिंकताच म्हणाला, "५० पानांचा…"

Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ या मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अखेर विलास खुनाचा निकाल लागल्याने मालिकेला एक वेगळंच वळण आहे. साक्षी व प्रियाला शिक्षा झाल्याने प्रेक्षकही खुश आहेत. तर अर्जुन ही केस जिंकल्याने त्याचं सगळेच कौतुक करत आहेत. कलाकारांचं कौतुक होणं हिच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. आणि या शाबासकीसाठी हे कलाकार अहोरात्र मेहनत करताना दिसतात. एखादा स्पेशल सीन, मालिकेतील ट्विस्ट शूट करताना ही मंडळी काळ,वेळ न पाहता मेहनत घेत असतात. बरेचदा अधिक काळ शूट केल्याने नीट असा आराम न केल्याने कलाकारांच्या तब्येती बिघडतात, अशातही ही मंडळी कारणं न देत प्रेक्षकांच्या मनोरंजनास तत्पर असतात.

अशातच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या कोर्ट सीन शूटसाठी कलाकारांनी बरीच मेहनत घेतली. बरेच दिवस या एका दिवसाचे शूट करण्यासाठी लागले. याबाबत आता मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने सांगितले आहे. युट्युब व्हिडीओद्वारे अमित म्हणतो, “नमस्कार, आजचा एपिसोड बहुतेक सर्वांनाच खूप आवडलाय, मला बऱ्याच लोकांनी फोन करुन सुद्धा सांगितलं की, कोर्टाचा सीक्वेन्स खूप छान झाला. तुम्ही सर्वांनी अर्जुनला आणि या शोमधील प्रत्येक पात्राला खूप प्रेम दिलं. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. जेव्हा ३० दिवसांत निकाल लागणार आहे हे आम्हाला समजलं तेव्हा आम्ही सर्वांनीच खूप तयारी करायला सुरुवात केली होती. सर्वांना माहिती होतं की, खूप काम करावं लागणार आहे. त्यात आजारपण आलं पण, आम्ही कोणीच थांबलो नाही. काही झालं तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या गोष्टीवर माझा कायम विश्वास आहे. याचप्रमाणे मी मेहनत घेऊन काम केलं”.

आणखी वाचा – “पुरुषांचे विवाहबाह्य संबंध असणं कॉमन आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीच नवऱ्याच्या अफेअरवरुन धक्कादायक विधान, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Amit Bhanushali (@aamit.bhanushali)

पुढे अर्जुन म्हणाला, “चॅनेल, निर्माते, लेखक, स्क्रीनप्ले लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, लाइटमन, आमची टीम, प्रमोशनल टीम आजचा एपिसोड चांगला झालं याचं श्रेय संपूर्ण टीमचं आहे. मालिकेचं शूटिंग करताना प्रत्येक दिवशी नवीन परीक्षा असते. मालिकेत काम करणारे कलाकार कुठेही फिट होऊ शकतात हे मी कायम म्हणतो. सगळेजण खूप मनापासून काम करत आहेत. चॅनेलपासून ते निर्मात्यांपर्यंत प्रत्येकाचे मी आभार मानतो”.

आणखी वाचा – लेक असावी तर अशी! वयाच्या २८व्या वर्षी आईसाठी घेतलं नवं घर, अभिनेत्रीच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाची झलक समोर

शेवटी अर्जुन व्हिडीओमध्ये म्हणाला, “आम्ही सगळे मेकअप रुममध्ये बसून आधी स्क्रिप्ट वाचतो. त्यानंतर मग शूटिंगला सुरुवात होते. कोर्ट सीक्वेन्स जेव्हा असतो, तेव्हा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कोर्टाचा जो शेवटचा सीन होता तो एकूण ५० पानांचा होता. त्यात सगळ्यात जास्त माझे संवाद होतो त्यामुळे खूप मेहनत घेतली होती”.

Tags: marathi actormarathi serialTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Utkarsh Shinde Marathi video

काश्मीरमधील मुस्लिम दुकानदाराचा मराठीत संवाद, उत्कर्ष शिंदेने दाखविली झलक, म्हणाला, "इथे धंदा करा, पैसे कमवा पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.