रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! विधीदरम्यानचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, पण होणारा नवरा कोण?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 1, 2025 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prajakta gaikwad goodnews

प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! विधीदरम्यानचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, पण होणारा नवरा कोण?

prajakta gaikwad goodnews : प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील भावुक करणारा क्षण म्हणजे लग्न. एकदा का मुलगी वयात आली की तिचं लग्न लावून तिच्या सासरी गेली म्हणजे आई-बाबाचं मोठं टेन्शन गेलं. आपल्या मुलीच लग्न लावून तिचा सुखाचा संसार पाहण्याची इच्छा प्रत्येक पालकांची असते. तर मुलींच्याही आयुष्यातील हा खास क्षण असला तरी तो भावुक करणारा असतो. या क्षणाबाबत एका सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजेच प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

प्राजक्ताने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून रसिकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावरही प्राजक्ता नेहमीच सक्रिय असते. अभिनयासह ती तिच्या नृत्यामुळे आणि फोटोशूटमुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली आहे. अशातच प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा सुरु आहे. ठरलं असं म्हणत प्राजक्ताने थेट एका विधिदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा”, असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – खूप काम, आजारपण आणि…; ‘ठरलं तर…’च्या कोर्ट सीनसाठी अर्जुनने घेतली इतकी मेहनत, केस जिंकताच म्हणाला, “५० पानांचा…”

View this post on Instagram

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

जरीची साडी, पारंपरिक दागिने, गजरा परिधान करत तिने या खास विधींसाठी साऊथ इंडियन लूक केला होता. गळ्यातील हार पाहता अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे हे विधी असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ही आनंदाची बातमी प्राजक्ताने दिली असली तरी तिचा होणार नवरा कोण आहे?, हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे. प्राजक्ताने ठरलं म्हणत फक्त तिचेच विधी दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे अर्थातच प्राजक्ता विवाहबंधनात कोणाबरोबर अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आणखी वाचा – “कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र?”, कळसुबाई शिखरावरील कचऱ्याचा ढीग पाहून अभिनेता भडकला, म्हणाला, “शिवरायांचा महाराष्ट्र…”

प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टवर तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकार मंडळींनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जात आहे. एकूणच ती तिच्या आयुष्यातील एक नवं पाऊल टाकण्यासाठी खूप खुश आहे.

Tags: entertainmentmarathi actressprajakta gaikwad
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Tharala Tar Mag Jui Gadkari Post

ना मालिका संपणार, ना लीप येणार…; जुई गडकरीच्या पोस्टने चाहते काळजीत, म्हणाली, "एक मोठा धडा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.