शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महाराष्ट्र अजून चिखलात जात आहे आणि…”, सुबोध भावेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “प्रभू श्रीराम असल्यासारखं…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2023 | 3:18 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor subodh bhave talk on todays youth and their social media use

"महाराष्ट्र अजून चिखलात जात आहे आणि...", सुबोध भावेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "प्रभू श्रीराम असल्यासारखं..."

मराठी सिनेसृष्टीत विविधांगी भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधने आजवर अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमधून काम केले आहे. त्याचबरोबर ‘कट्टयार काळजात घुसली सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केले आहे. सुबोध हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर त्याच्या कामाबद्दलची माहितीही देत असतो. सुबोध हा अभिनेता असण्याबरोबर त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळेही तितकाच ओळखला जातो. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुबोधने नुकतीच ‘इसापनिती’च्या छापा-काटा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. या कार्यक्रमात त्याने अनेक विषयांवर परखडपणे मत मांडले आहे. यावेळी त्याने सोशल मीडियाबद्दलही त्याचे मत व्यक्त केले. या मुलाखतीत त्याला “आजची तरुणपिढी सोशल मीडियाच्या विळख्यात अडकली आहे. रील्स, व्हिडीओच्या आहारी गेली आहे. तर या तरुणांना तुम्ही काय सांगाल? सुरुवातीच्या काळात त्यांचा पाया भक्कम व्हावा म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुबोधने उत्तर देत असे म्हटले की, “मी यांना काहीही सांगणार नाही. सोशल मीडियावर प्रत्येकजण कुणाला तरी काहीना काही शिकवतच असतो आणि हे या माध्यमाचे नुकसान आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण आदर्शाचा पुतळा व प्रभू श्री राम असल्यासारखे वागतो. त्यामुळे मी कुणालाच काहीच सांगणार नाही. ज्ञानेश्वरांनी जो जे वांछिल तो ते लाभो पसायदान हे असं म्हटलं आहे. अगदी तसंच आहे. त्यामुळे ज्याला जे आवडतं तो ते करतो, ज्याला नाही आवडत तो नाही करणार. त्यामुळे मी सांगून कुणामध्ये काहीच बदल घडणार नसतो. आपल्या महाराष्ट्रात इतकी संतपरंपरा होती. पण महाराष्ट्र सुधारला नाही. तो अजून चिखलात चालला आहे. तर मी सुबोध भावे अगदी सामान्यातला सामान्य माणूस आहे. त्यामुळे माझ्या सांगण्याने काहीच फरक पडणार नाही.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

आणखी वाचा – अमृता फडणवीसांचं नवं गाणं ‘तुम्हे आईने की जरुरत नहीं’ प्रदर्शित, आवाज ऐकून नेटकरी म्हणाले, “कर्कश आवाज आणि…”

यापुढे त्यांनी असे म्हटले की, “कुठलीही गोष्ट माणूस तेव्हाच शिकतो, जेव्हा त्याला त्यातून काहीतरी अनुभव आलेला असतो. लहान मुल जसं लहानाचा मोठा होत असताना अनेकदा पडतो आणि मग काही काळाने तो हळूहळू कशाचा तरी आधार घेत उभा राहायला शिकतो. हे उभं राहणं त्याच्या आईच्या सांगण्यावरून आलेलं नसतं तर त्याच्या अनुभवातून तो हळूहळू उभं राहायला शिकलेला असतो. त्यामुळे त्यांना सल्ला म्हणून माझे एकच सांगणे असेल, ते म्हणजे तुम्ही आता जे करत आहात ते आनंदाने व मनापसून करा. त्या प्रक्रियेचा आनंद घ्या. आताच्या डिजिटल युगात कितीतरी नवीन तंत्रज्ञान येत आहेत. पण या सगळ्याला मेहनत हा एकच पर्याय आहे. मेहनतीला पर्याय नाही.”

आणखी वाचा – ऋतुजा बागवेने चित्रपटातील स्वतःचे सीन्स काढण्यास सांगितले अन्…; रितिका श्रोत्रीचा खुलासा, म्हणाली, “पहिलाच चित्रपट तरीही…”

दरम्यान, सुबोध हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतो. अशातच तो या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचबरोबर कट्टयार काळजात घुसली या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर सुबोध पुन्हा एका दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. लवकरच त्याचा ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात तो दिग्दर्शनाबरोबरच अभिनयही करणार आहे.   

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi newssubodh bhave
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Tanushree dutta speaks about kissing scenes

"अवघडल्यासारखं वाटलं अन्…", 'आशिक बनाया'मध्ये इमरान हाश्मीला किस करण्यावरुन १८ वर्षांनंतर तनुश्री दत्ताचं भाष्य, म्हणाली, "किस करताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.