Subodh Bhave stuck in traffic : मराठी अभिनेता सुबोध भावे हा नेहमी चर्चेत राहणारा अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तो ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेमदेखील मिळत आहे. अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेलाही पाहायला मिळतो. त्याची अनेक सडेतोड मतं तो सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करताना दिसतो. अशातच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे.
सुबोधने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो घोडबंदर रोड येथे ट्राफिकमध्ये अडकलेला दिसत आहे. मुंबईमध्ये सध्या ट्राफिकची समस्या अधिक असलेली दिसून येत आहे. याबद्दल आधीही अनेक मराठी कलाकारांनी व्हिडीओ शेअर करत करत संताप व्यक्त केला होता. सुबोधने देखील व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “ट्राफिकमुळे आज ९ चा एपिसोड पण १० वाजता सुरु होईल वाटतं”,असं लिहिलं आहे. सुबोधच्या या व्हिडीओ व कॅप्शनमुळे उपहासात्मक टिका केल्याचे समोर आले आहे.
सुबोधने शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली असून अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हंटले की, “लवकर निघायचे ना घरातून जरा”, दुसऱ्या एका नेटकाऱ्याने लिहीले की, “आम्ही वाट पाहू”. दरम्यान यामध्ये अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या मालिकेचे कौतुकदेखील केले. तसेच या मालिकेतील भूमिकादेखील आवडत असल्याचेही म्हंटले आहे.
याआधी अभिनेता शशांक केतकर व ऐश्वर्या नारकर यांनीदेखील ट्राफिकच्या समस्येवर संतापजनक पोस्ट शेअर केली होती. दोघांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्याही समस्या शेअर केल्या होत्या. त्यामुळे आता मुंबईतील ट्राफिक ही एक मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी असेही जनता म्हणत आहे.