सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरेचदा भाष्य करत असतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या नशिबात कधीच प्रेम मिळालेलं नाही. काहींना एकदा नव्हे तर पुन्हा लग्न करुनही खरा जोडीदार मिळू शकला नाही. यापैकी एक म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर. निखिल पटेल व दलजीत यांचा विवाह १८ मार्च २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नानंतर अभिनेत्री आपल्या पतीसह मुलासह केनियाला शिफ्ट झाली. मात्र जानेवारी महिन्यात ही अभिनेत्री भारतात परतली. दरम्यान, दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. तेव्हापासून, दलजीत कौरचा माजी पती निखिल पटेल त्याच्या मैत्रिणीबरोबर भारतात फिरतानाही दिसला. दरम्यान, या मोडलेल्या लग्नाच्या वेदनेतून दलजीत कौरही हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. अलीकडेच दलजीत कौरने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिचे व निखिलचे जुळणारे टॅटू दाखवत आहे. (Dalljiet Kaur Nikhil Patel)
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्वतःचे व निखिल पटेलचे जुळणारे टॅटू असलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओ क्लिपमध्ये अभिनेत्रीने तिच्या टॅटूची झलक दाखवली आहे. आणि ही झलक खूप सुंदर होती. निखिलबरोबरच्या लग्नात मेहेंदी लावताना दलजीत तिचा टॅटू खूप फ्लॉन्ट करताना दिसली होती. व्हिडीओमध्ये तिने तिच्या व निखिलच्या पासपोर्टची जुनी झलकही दाखवली. जेव्हा ती त्यांच्या लग्नानंतर देश सोडून जात होती.
व्हिडीओबरोबर, दलजीतने या टॅटूबद्दल आपल्या भावनिक भावना सांगत एक पोस्ट लिहिली आहे. दलजीतने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “हे पुन्हा प्रेम व विश्वासात पडण्याची शक्ती दर्शवते. मला स्वतःसाठी, माझ्या मुलासाठी एक कुटुंब तयार करायचे होते, म्हणून मी नऊ वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच मी देश सोडला. मला जे आवडते ते करण्यासाठी मी सज्ज झाले होते कारण मी एक कुटुंब बनवण्याच्या स्वप्नात हरवले होते”.
अभिनेत्रीने पुढे लिहिले, “मला ज्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास सांगितले जात होते, ती एक संधी होती. मी माझा मुलगा जेडेनसाठी कुटुंब बनवत होते. पण माझ्या लग्नात विश्वास, निष्ठा, प्रेम, आदर नव्हता. मी पुन्हा माझा टॅटू बदलण्याचा विचार करत असल्याचे दलजीतने सांगितले. माझा टॅटू पुन्हा डिझाईन करण्याचा आग्रह धरणाऱ्या सर्वांसाठी मी आता ते करणार आहे आणि काहीतरी मजेशीर करणार आहे”. दलजीत कौर व निखिल पटेल यांनी त्यांच्या लग्नापूर्वी जुळणारे टॅटू बनवले होते. या टॅटूमध्ये दोन हातांनी एक क्लॅपर बोर्ड पकडला होता, ज्यावर तारखेसह ‘टेक २’ असे लिहिले होते.