बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती अभिनेता सैफ अली खानबरोबर लग्नबंधनातही अडकली. सैफचे करीनाबरोबर दुसरे लग्न आहे तर त्याने पहिले लग्न हे अभिनेत्री अमृता सिंहबरोबर केले होते. अमृता व सईफ यांना सारा व ईब्राहिम अशी दोन मुलं आहेत. लग्न झाल्यानंतर काही वर्षांमध्येच दोघांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सैफ करीनाच्या प्रेमात पडला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Kareena kapoor on amrita singh)
सैफ व करीना यांनी २०१२ साली नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यांना तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. करीनाचे सासरच्या सर्व मंडळींबरोबर चांगले संबंध आहेत. यामध्येच अमृता व करीना यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होताना पाहायला मिळते. आजवर त्यांची एकदाही भेट झाली नसल्याचे बोलले आहे. मात्र जुन्या मुलाखतीमध्ये दोघीनीही एकमेकींसाठी चांगले बोलल्याचे दिसून आले आहे. एका मॅगझीनबरोबर बोलताना करीनाने अमृताची चाहती असल्याचे सांगितले होते.
करीनाने २००८ साली ‘पिपल मॅगझीन’बरोबर बोलताना अमृताबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी तिला विचारण्यात आले होते की, “सैफ व पहिल्या बायकोच्या नात्याबद्दल कधी बोलणं होतं का?”, त्यावर करीनाने उत्तर दिले की, “मला सैफबद्दल आदर आहे. याआधीही त्याचं लग्न झालं होतं याबद्दल मला काहीही समस्या नाही. त्यांची दोन प्रेमळ मुलंदेखील आहेत. मी अमृता यांची खूप मोठी चाहती आहे”.
पुढे ती म्हणाली की, “मी अमृता यांना कधीही भेटले नाही. पण त्यांच्या चित्रपटामुळे मी त्यांना ओळखते. माझ्यासाठी त्या नेहमी सैफच्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या व्यक्ती राहतील. त्या सैफची पत्नी असण्याबरोबरच त्याच्या मुलांची आईदेखील आहेत. हे सर्व मी सैफबरोबर बोलले आहे. त्यांचा मी नेहमी आदर करते. माझ्या आई-वडिलांनी मला हे शिकवलं आहे”.
त्यानंतर ती म्हणाली की, “अमृता व सैफचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणांमुळे लग्न टिकू शकलं नाही. दोघं चांगले मित्र राहवेत असं मला वाटत. दोघांना सध्या वेळ देण्याची गरज आहे. मी नेहमीच अमृता यांचा आदर करेन”. सध्या सैफ व करीना हे दोन मुलांसहित सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले होते. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.