केदारनाथला जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. आयुष्यात एकदा तरी केदारनाथला जाऊन दर्शन घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र यासाठी योग जुळून येणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अशीच एका अभिनेत्याची शूटिंगच्या निमित्ताने केदारनाथला जाण्याची आणि भगवान शंकरांचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. नुकताच त्याचा ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि यानिमित्तने अभिनेता ठिकठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या केदारनाथच्या एका अनोख्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. अजब गजबला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या केदारनाथमधील भगवान शंकरांच्या दर्शनाचा एक किस्सा सांगितला आहे. (Siddharth Chandekar Kedarnath story)
यावेळी त्याने असं म्हटलं की, “मी शूटिंगसाठीच पाहिल्यांदा केदारनाथला गेलो होतो. खूप मोठी रांग होती आणि शूटिंगलाही वेळ कमी होता. मला आत जाऊन दर्शन घ्यायचं होतं आणि दिसत होतं की, खूप वेळ लागणार आहे. म्हणजे जवळपास तीन तास तरी लागले असते. त्यामुळे मी ठरवलं की, आत जात नाही, कारण पुन्हा खूप वेळ लागेल. पण तेव्हा काय माहीत नाही. मला तिथला एक गार्ड बोलवायला आला आणि तो बोलला की “तुम्हाला आत बोलावलं आहे”. तर मी म्हटलं की “कुणी बोलावलं आहे?”. तर तो पुन्हा फक्त “आत बोलावलं आहे” इतकंच बोलला. तर मी गेलो”.
आणखी वाचा – अक्षराला तिच्या मित्राबरोबर पाहताच अधिपतीच्या मनात संशय, पती-पत्नीच्या नात्यामध्ये संशयाचं वादळ, फुट पडणार
यापुढे त्याने असं म्हटलं की, “त्या गार्डने मला एका वाटेने आत नेलं आणि तिथे शंकर भगवानच समोर दिसले. मी तिथे जाऊन बसलो आणि तिथे पाठ आहे शंकर भगवानांची. तिथे भस्म वगैरे लावतात. तर मला नेमकं कळलं नाही. माझ्याकडून ते घडलं. पण नेमकं बोलवलं कुणी हे माहीत नाही. कदाचित मला वाटलं नाना सर (नाना पाटेकर) आत होते तर त्यांनी मला बोलावणं पाठवलं असेल. पण मी त्यांना नंतर विचारलं. तर तेसुद्धा मला “नाही अरे मी नाही बोलावलं” असं म्हणाले”.
आणखी वाचा – ‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, लूकने वेधलं लक्ष, खास फोटो समोर
दरम्यान, नव्या वर्षात सिद्धार्थ व मिताली या दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी देत त्यांच्या ‘फसक्लास दाभाडे’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली. सिद्धार्थ-मितालीचा ‘फसक्लास दाभाडे’ हा एकत्र पहिला चित्रपट त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसालाच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.