मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांची सध्या लगीनघाई सुरु आहे. अलीकडेच टीव्ही अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांनी साता जन्माची गाठ बांधली. येत्या काळात दिव्या पुगावकर, अंकिता वालावलकर असे बरेच सेलिब्रिटी लग्न करणार आहेत. यातच आता आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे आणि हा अभिनेता म्हणजे ‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेता अभिषेक रहाळकर. नुकतीच त्याच्या साखरपुड्याची बातमी सोसजळ मीडियावर व्हायरल झाली होती. अशातच आता त्याचे लग्न झाल्याचे समोर येत आहे. रुमानी खरेने त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच तिने लग्नाचाही फोटो शेअर केला आहे. (Abhishek Rahalkar marriage)
रुमाबी खरेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिषेक व कृतिका (अभिषेकची पत्नी) यांचा लग्नातील खास फोटो शेअर केला आहे आणि या फोटोवर “आणि त्यांनी लग्न केलं आहे” असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये अभिषेक व त्याच्या पत्नीचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. अभिषेकने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी व त्यावर डिझायनर फेटा परिधान केला आहे. तर त्याच्या पत्नीने सोनेरी रंगाची साडी परिधान केली असून त्यावर डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. दोघे या फोटोमध्ये अतिशय आनंदी दिसत आहेत.

अभिषेकने कोणत्याही गाजावाजाशिवाय गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकल्यामुळे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच चाहत्यांना सुखद धक्का लागला. अशातच त्याच्या लग्नाचा हा फोटो पाहूनही चाहत्यांना सुखद धक्का बसला असेल इतकं नक्की… अभिषेक रहाळकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याच्या या लग्नातील फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
अभिषेकच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ऋतूजा कुलकर्णी असं आहे. अभिनेता अभिषेक रहाळकरने ‘मन धागा धागा जोडते नवा’ लोकप्रिय मालिकेत काम केले होते. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील सार्थक-आनंदीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.