मराठीमधील टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये सिद्धार्थ चांदेकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सिद्धार्थने मेहनतीच्या जोरावर कलाश्रेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिका, चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना तो सोशल मीडियावरही अधिक सक्रिय असतो. आपल्या कामाविषयी प्रत्येक माहिती देताना तो दिसतो. पण त्याचबरोबरीने सोशल मीडियाद्वारे खासगी आयुष्याबाबत व्यक्त होणं त्याला आवडतं. त्याच्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या घडामोडी तसेच त्याबाबत भाष्य करण्यास सिद्धार्थ पुढे सरसावतो. आताही त्याने शेअर केलेली एक पोस्ट मनाला चटका लावून जाणारी आहे. सिद्धार्थच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.
सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या शांता काकूंचा आहे. पण शांता काकू या नेमक्या कोण आहेत? हे सिद्धार्थने सांगितलं नाही. त्यांच्या निधनाने तो कोलमडून गेला आहे. शांता काकुंच्या अचानक जाण्याने सिद्धार्थला दुःख अनावर झालं. त्याने फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं.
आणखी वाचा – Nitin Desai Funeral : …अन् वडिलांना पाहून लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर
सिद्धार्थ म्हणाला, “तुझी आणि तुझ्या हातच्या स्वयंपाकाची आठवण येत राहील शांता काकू. RIP”. सिद्धार्थच्या या पोस्टवरुन त्याला शांता काकूंच्या हातचं जेवण आवडत असावं असं समजतं. त्याने त्यांचा एक जुना फोटो शेअर करत आपल्या जवळच्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहिली.
आणखी वाचा – जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही जिनिलीया देशमुख, म्हणालेली, “तेल न वापरता मी…”

सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं काही सेलिब्रिटींना जमत नाही. पण सिद्धार्थ याला अपवाद आहे. वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य करणं त्याला आवडतं. म्हणूनच आताही त्याने त्याचं दुःख सगळ्यांबरोबर शेअर करणं पसंत केलं. पण त्याचं शांता काकुंशी नातं काय होतं? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.