Happy Birthday Genelia Dsouza : बॉलिवूडमधील नावाजलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख. या सेलिब्रिटी जोडप्याला प्रेक्षकांचं व चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळतं. दोघांनाही मोठ्या पडद्यावर एकत्रित पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. रितेशने कलाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय भूमिका साकारत नेहमीच सिनेरसिकांचं भरभरुन मनोरंजन केलं. मात्र जिनिलीया काही वर्ष कलाक्षेत्रापासून दूर राहिली. ‘वेड’ या मराठी चित्रपटाद्वारे तिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीमध्ये कमबॅक केलं. आज जिनिलीयाचा वाढदिवस आहे. ती कुटुंबियांबरोबर वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त तिच्यामधील काही खास कलागुणांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
जिनिलीयाने जवळपास १० वर्ष चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. घर, संसार, मुलं सांभाळण्यात ती रमली होती. मात्र तिने तिच्या इच्छेनुसार हा पर्याय निवडला होता. कामाबरोबरच तिने तिच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. जिनिलीयाची हिच खासियत सगळ्यांना आवडते. इतकंच नव्हे तर जिनिलीया मराठी संस्कृतीही जपते. लग्नानंतर मराठी पदार्थ कशाप्रकारे बनवायचे हे ती शिकली.
जिनिलीया तिच्या व्यग्र वेळापत्रकामधून मिळालेल्या वेळेत बऱ्याचदा स्वयंपाकही करते. विशेष म्हणजे ती जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही. जिनिलीयानेच एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. जेवण बनवणाता तेलाऐवजी ती शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करते. शेंगदाण्याच्या कुटामध्येच ती जेवण बनवते. जिनिलीयाच्या म्हणण्यानुसार त्यामध्येच पुरेसं तेल असतं. त्यामुळे ती जेवणामध्ये तेल वापरणं टाळते.
आणखी वाचा – Nitin Desai Funeral : …अन् वडिलांना पाहून लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर
जिनिलीया तिचं शारीरिक आरोग्य अधिक जपते. म्हणूनच ती तेलाचा वापर करत नाही. इतकंच नव्हे तर तिला इतर महाराष्ट्रीयन पदार्थही आवडतात. पिठलं, भाकरी, ठेचा, पुरणपोळी हे तिच्या आवडीचे पदार्थ आहे. सासूबाईंनी बनवलेली पुरणपोळी जिनिलीया आवडीने खाते. महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी उत्तम असतात असं तिचं म्हणणं आहे. एकंदरीतच काय तर जिनिलीया आरोग्यासाठी उत्तम असलेल्या पदार्थांचं सेवन करते.