सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कधीही रील बनवून नाचली नाही पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आईचा धमाल डान्स, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, “आयुष्यात सारंकाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 14, 2023 | 9:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemant Dhome On Jhimma 2

"कधीही रील बनवून नाचली नाही पण…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आईचा धमाल डान्स, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, "आयुष्यात सारंकाही…"

‘झिम्मा २’ हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या टीझरने, चित्रपटातील गाण्याने आणि ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘मराठी पोरी दाखवतो दुनियेला माज…’ हे गाणं सध्या साऱ्या रसिक प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडतंय. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत अनेकांना या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही आहे. अनेकांनी या गाण्यावर रील बनवत शेअर देखील केले आहेत. सध्या हे गाणं ट्रेंडिंग वर आलं असल्याचंही पाहायला मिळत आहे. (Hemant Dhome On Jhimma 2)

काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील मुख्य अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर या दोघांनी या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. नुकत्याच पार पडलेल्या ‘झिम्मा २’ च्या ट्रेलर लॉंच सोहळ्यामध्येही चित्रपटातील कलाकारांनी या गाण्यावर धुमाकूळ घातला. यानंतर आता ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. एक आनंदी व भावुक अशी पोस्ट शेअर करत हेमंतने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – “मला फरक पडत नाही कारण…”, दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून कोणत्याच गिफ्टची अपेक्षा ठेवत नाही प्रिया बापट, म्हणाली, “कोणत्याही सणाला…”

हेमंतने ‘मराठी पोरी…’ या गाण्यावर त्याची आई ठेका धरतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याखाली त्याने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “जिच्यावरून प्रेरित ‘झिम्मा’ मधील निर्मला कोंडे-पाटील म्हणजेच निर्मिती सावंत या साकारत असलेल्या हे पात्र आहे ती म्हणजे माझी आई वैशाली ढोमे. कधीही असं रील बनवुन नाचली नाही, पण हे पण तिने करून पाहिलं! आयुष्यात सारंकाही करून बघायची इच्छा कायम जिवंत ठेवणारी, जगण्याचा आनंद लुटणारी माझी आई. मला आणि आमच्या कुटुंबाला कायम हसवणारी आणि माया देणारी माझी आई, माझी निर्मला! लव्ह यु मम्मा. या रीलमध्ये तिला साथ देतेय आमची बहिणाबाई सोनाली ढोमे”.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

आणखी वाचा – इयत्ता पहिलीपासूनची ओळख ते १२ वर्षांचा संसार…; ‘जय जय स्वामी समर्थ’ फेम अक्षय मुडावदकर यांची रिअल लाईफ प्रेमकहाणी आली समोर, म्हणाले, “अगदी महिन्याभरात…”

हेमंतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या आईच कौतुक केलं आहे. तर अनेकांनी सिनेमाबाबत उत्सुकता दर्शविली आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज होत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे यांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: entertainmenthemant dhomejhimma 2jhimma 2 song
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Dattu More celebrates his first diwali after marriage

पारंपरिक लूक, उत्साह अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेची लग्नानंतरची पहिली दिवाळी, चाळीतील घराचीही दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.