मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिलेली पाहायला मिळाली. तर काहीं कलाकार जोड्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटोही समोर आले. अशातच काही दिवसांपूर्वी लोकप्रिय कलाकार जोडीने त्यांच्या प्रेमची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने प्रियकराबरोरबचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. थेट केळवणाचे फोटो शेअर करत दोघांनी प्रेमात असल्याची कबुली देत लवकरचं लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. (Siddharth Bodke Propose Titeeksha Tawde)
तितीक्षा तावडे अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह रिलेशनशिपमध्ये असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. बऱ्याच दिवसांपासून तितीक्षा व सिद्धार्थ यांच्यात काहीतरी सुरु असल्याचा चर्चा रंगल्या होत्या, मात्र तेव्हा दोघांनाही या चर्चांना दुजोरा दिला नाही. त्यानंतर थेट केळवणाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने त्यांचं रिलेशनशिप जाहीर केलं.
यानंतर आता ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने सिद्धार्थने तितीक्षाला सरप्राईज देत तिला प्रपोज केलं असल्याचं समोर आलं आहे. तितीक्षा एका गाण्याच्या शुटनिमित्त बाहेर असताना त्या ठिकाणी जात सिद्धार्थने गाण्याच्या एका टेकमध्ये तितीक्षाला प्रपोज केलं आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त तितीक्षाने या गोड आठवणी तिच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केल्या आहेत. तितीक्षा गाण्याच्या शूटसाठी तयार झालेली पाहायला मिळत होती. तर सिद्धार्थ तितीक्षाला सरप्राईज देण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं. ‘व्हॅलेंटाईन डे’दिवशी सिद्धार्थने दिलेलं हे खास सरप्राईज तितीक्षासाठी खूप खास आहे.
दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या व्हिडीओची लिंक शेअर करत एकमेकांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. तितिक्षा व सिद्धार्थ बोडके हे दोघेही एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत ते दोघे एकत्र झळकले होते. त्यानंतर दोघेही ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेतही एकत्र दिसले. त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. लवकरच आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.