बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सिंघम अगेन’ चित्रपटातील अर्जुन कपूरचा खतरनाक लूक आला समोर, दिसणार ‘या’ खास भूमिकेत

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 14, 2024 | 4:53 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Arjun Kapoor Singham again first look

'सिंघम अगेन' चित्रपटातील अर्जुन कपूरचा खतरनाक लूक आला समोर, दिसणार 'या' खास भूमिकेत

२०११ मध्ये रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफ़िसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यानंतर ‘सिंघम’ चित्रपटाचा दूसरा भाग ‘सिंघम रिटर्न’ प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटालाई प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. अशातच आता ‘सिंघम’चा तिसरा भागही लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. रोहित शेट्टीने नुकतीच ‘सिंघम’चा तिसरा भाग असलेल्या ‘सिंघम अगेन’ची घोषणा केली. ही घोषणा करताना चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. आतापर्यंत या चित्रपटातील अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ यांचे फर्स्ट लूक चाहत्यांसमोर आले आहेत. अशातच आता चित्रपटामध्ये खलनायक साकारणाऱ्या अर्जुन कपूरचा फर्स्ट लूकही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अर्जुन कपूरच्या या अनोख्या लूकने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या लूकमध्ये अर्जुनचा रक्ताने माखलेला चेहरा दिसत आहे. त्यामुळे त्याच्या लूकवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Arjun Kapoor Singham again first look )

आणखी वाचा – Video : सिद्धार्थने प्रपोज करत तितीक्षाला दिलं ‘हे’ खास सरप्राइज, ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त दाखवली झलक, म्हणाला…

चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने सोशल मीडियावर दोन फोटो अपलोड केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोमध्ये अर्जुन कपूरच्या हातात हत्यार असून त्याच्या चेहऱ्यावर रक्त व भयंकर हास्य हे थरकाप उडवणारे चित्र पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये रणवीर व अर्जुन एकमेकांकडे सूचकात्मक बघताना दिसत आहेत. हे फोटो अपलोड करुन त्यावर त्याने, “माणूस चूक करतो पण त्याची त्याला शिक्षा देखील मिळते, पण आता जो येईल तो सैतान आहे, सादर करत आहे अर्जुन कपूर”, असं कॅप्शन दिलं आहे.

रोहित शेट्टीने फोटो अपलोड केल्यानंतर अर्जुननेदेखील ‘सिंघम अगेन’ ची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपले फोटो अपलोड करुन “सिंघमचा खलनायक. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा भाग झालो असून खूप आनंदात आहे” असे कॅप्शन त्याने दिलं आहे.

आणखी वाचा – आदित्य नारायणच्या ‘त्या’ कृतीमागील सत्य आलं समोर, मॅनेजरने खुलासा करत म्हटलं “सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण…”

‘सिंघम अगेन’ हा ‘सिंघम’ चित्रपटाचा तिसरा भाग असून आधीच्या सर्व भागांमध्ये भरपूर ॲक्शन पाहायला मिळाली. ‘सिंघम अगेन’मध्ये तगडी स्टारकास्ट असून यामध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर व अर्जुन कपूर धमाका करताना दिसून येणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अतिरंजक मेजवानी ठरणार आहे.

Tags: arjun kapoorarjun kapoor first lookbollywood movierohit shettysingham again
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Gauri khan first opened her restaurant tori in Mumbai bandra photos shared on social media

हटके इंटिरिअर, स्वादिष्ट जेवण अन्...; शाहरुख खानच्या बायकोने मुंबईत सुरु केलं स्वत:चं आलिशान हॉटेल, सगळं काही आहे खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.