शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्विमिंगपूल, हटके इंटेरियर अन्…; इतकं आलिशान आणि मोठं आहे प्राजक्ता माळीचं फार्महाऊस, सगळं काही आहे खास, पाहा व्हिडीओ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 14, 2024 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Mali Farmhouse

स्विमिंगपूल, हटके इंटेरियर अन्…; इतकं आलिशान आणि मोठं आहे प्राजक्ता माळीचं फार्महाऊस, सगळं काही आहे खास, पाहा व्हिडीओ

सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. बऱ्याच कलाकारांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं त्यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत सांगितलं. याचबरोबर काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही फार्महाऊस खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. प्राजक्ता माळीने काही महिन्यांपूर्वी कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस खरेदी केलं. (Prajakta Mali Farmhouse)

निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कुशीत सुंदर असं फार्महाऊस असावं अशी प्राजक्ताची इच्छा होती ती पूर्ण झाली. अभिनेत्रीने या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असं ठेवलं आहे. या प्राजक्ताच्या फार्महाऊसचा एक सुंदर असा व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावेळी अभिनेत्रीच्या या भव्य, आलिशान अशा फार्महाऊसची झलक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अभिनेत्रीने तिच्या या फार्महाऊसची झलक चाहत्यांसह शेअर केली आहे.

आणखी वाचा – जान्हवी व खुशी कपूरमध्ये वाद, सोशल मीडियावर मागितली एकमेकांची माफी, कलाकारांनी दोघींचं सांत्वन केलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, प्राजक्ता माळीचं फार्महाऊस सुंदर व्ह्यू, मोठ्या खोल्या, ओपन स्विमिंग पूल, आकर्षक फर्निचर अशा सुखसोयींनी परिपूर्ण असलेलं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असं असलं तरी, ‘द ग्रीन मोन्टाना’ या नावाने तिने हा सुंदर व्हिला एका नामांकित कंपनीकडे रजिस्टर केला आहे. यामुळे आता कोणतेही पर्यटक रजिस्टर वेबसाईटवर रितसर बुकिंग करून प्राजक्ताच्या बंगल्यात राहू शकतात.

आणखी वाचा – सोने, चांदी, आलिशान गाड्या अन्…; जया बच्चन यांच्याकडे आहे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती, हेमा मालिनीलाही टाकलं मागे

प्राजक्ताच्या या फार्महाऊसमधील किचन, ओव्हन, गॅस, गार्डन या सुखसोयीही असलेल्या पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या कुशीत असलेले कर्जत येथील प्राजक्ताचं प्राजक्तकुंज हे फार्महाऊस साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे. प्राजक्ताच्या वाढदिवशी हास्यजत्रेतील कलाकार मंडळी तिच्या फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचले होते. यावेळीही त्यांनी अभिनेत्रीच्या फार्महाऊसमधील खास फोटो शेअर केले होते.

Tags: entertainmentmarathi actressprajakta maliprajakta mali farmhousePrajakta Mali Farmhouse videoprajaktkunj farmhouse
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bollywood singer aditya narayan concert manager supports to singer on viral video of hitting fan with mic

आदित्य नारायणच्या ‘त्या’ कृतीमागील सत्य आलं समोर, मॅनेजरने खुलासा करत म्हटलं "सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.