रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भारतात माणसाचं आयुष्य स्वत, शुन्य किंमत”, पार्किंगवरुन भडकला शशांक केतकर, चीड आणणारा Video

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 13, 2025 | 12:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shashank ketkar angry on double parking

“भारतात माणसाचं आयुष्य स्वत, शुन्य किंमत”, पार्किंगवरुन भडकला शशांक केतकर, चीड आणणारा Video

सामाजिक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शशांक केतकर. सोशल मीडियाद्वारे शशांक अनेक सामाजिक समस्या सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरी तर त्याने कचऱ्याचे ढिग, रस्त्यांची दुरावस्था अशा अनेक समस्यांवर उघडपणे सांगितलं. व्हिडीओ शेअर करत भयान दृश्यही दाखवलं. आताही असाच एक मुद्दा त्याने सगळ्यांसमोर आणला आहे. बऱ्याचदा डबल पार्किंगची समस्या अनेकांना सतावते. शशांकच्या ठाण्यातील सोसायटीबाहेर असाच काहीसा प्रकार घडला. त्याने थेट डबल पार्किंग केलेली गाडी आणि तेव्हा निर्माण झालेली परिस्थिती व्हिडीओद्वारे सांगितली. (shashank ketkar angry on double parking)

शशांक व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “भारतामध्ये माणसाचं जगणं अत्यंत स्वस्त आहे आणि त्याची किंमतही शुन्य आहे. याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. दुर्देवाने ठाण्यातील माझीच सोसायटी. माझ्या सोसायटीच्या समोरच एका माणसाने कमालीचं पार्किंग केलं आहे. युपीची गाडी आहे. UP16BV0174 असा गाडीचा नंबर आहे. जे काही कमालीचं पार्किंग केलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. मध्ये जी तुम्हाला जागा दिसतेय तिथे आणखी एक गाडी होती. मध्ये असलेली गाडी त्या लोकांना बाहेर काढायची होती”.

आणखी वाचा – अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मराठी कलाकारही हळहळले, श्रद्धांजली वाहत थेट परमेश्वरालाच केला सवाल

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

“म्हणून डबल पार्किंग लावलेली गाडी बाजूला करण्यात आली. ती आता आणखीन बाहेर उभी आहे. विद्यार्थी कुठून चालत आहेत आणि गाडी कुठे आहे? हे तुम्हीच बघा. एका गाडीने तो रस्ता किती व्यापून टाकला आहे?. या गाडीला आपटून चार माणसं मेली तरी काही फरक पडत नाही. आपल्याकडे हाच प्रॉब्लम आहे. या झोनचा असा हा भारत आहे. एकतर आमच्या वसंत विहारमध्ये डबर पार्किंग करतात हा विषय मोठा आहेच”.

आणखी वाचा – तीन लग्न, हृदयविकाराच्या झटक्याने निधन अन्…; करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती घटस्फोटामुळे राहिलेले चर्चेत, कोण होते संजय कपूर?

“पण त्याचा लोकांना किती त्रास होणार आहे?. आहे की नाही गंमत?. जेमतेम बाईक जागेमधून पास होत आहे. आपल्याकडे जीव खरंच स्वस्त झाला आहे. बीएमसी हे बघा. मला माहित नाही की, ही जबाबदारी बीएमसीची असते की नाही?. पण ही गाडी फक्त उचलू नका तर ती भंगारमध्येही टाका”. शशांकने व्हिडीओला कॅप्शन दिलं की, “ठिकाण – वसंत विहार ठाणे, समस्या – डबल पार्किंग, त्रास – घंटा काहीही नाही, उपाय – चार लोक मेले की बघू”. शशांकने योग्य ती समस्या मांडली आहे.

Tags: entertainment newsmarathi actorshashank ketkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Vikrant Massey on Ahmedabad Plane Crash

अहमदाबाद विमान अपघातानंतर विक्रांत मेस्सीवर दुःखाचा डोंगर, जवळच्या वक्तीचे निधन, म्हणाला, "माझे काका…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.