शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मराठी कलाकारही हळहळले, श्रद्धांजली वाहत थेट परमेश्वरालाच केला सवाल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2025 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
MarathI Celebrity On Plane Crash

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मराठी कलाकारही हळहळले, श्रद्धांजली वाहत थेट परमेश्वरालाच केला सवाल

MarathI Celebrity On Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेने साऱ्या जगाला सुन्न केलं. हा भीषण अपघात मन हेलावणारा होता. एअर इंडियाचे बोईंग ८८७ ड्रीमलायनार एआय १७१ हे विमान उड्डाण घेताच काही क्षणातच खाली कोसळले आणि मोठा स्फोट झाला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. हे विमान अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणार होतं. मात्र काळ आला आणि सारं काही संपवून गेला. त्या विमानातील २४१ प्रवासी आणि विमान चालक व इतर कर्मचारी यांचा मृत्यू झाला. अहमदाबाद येथे घडलेल्या या अपघाताने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदाबाद विमानतळावरुन दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी या विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला. अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवाशी परिसरात विमानाचा अपघात झाला. या विमान अपघातानंतर देशभरातून प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी या घटनेनंतर पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली.

आणखी वाचा – करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे निधन, वयाच्या ५३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पोलो खेळताना…

अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी अतिशय हृदयद्रावक आहे.

या दुर्घटनेत ज्या लोकांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. त्यांचे कुटुंबीय, या अपघातातील जखमी आणि सर्व प्रभावित लोक यांच्याबद्दल मनापासून सहवेदना!

या कठीण काळात माझ्या प्रार्थना त्या…

— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 12, 2025

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने या घटनेनंतर पोस्ट शेअर करत थेट परमेश्वरालाच सवाल केला आहे. तर गौरव मोरेने दुःख झाल्याचं पोस्ट्सद्वारे म्हटलं आहे. अत्यंत दुःखद बातमी म्हणत मृण्मयी देशपांडे, तर ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हणत त्यांच्या कुटुंबियांना धीर देत जेनेलिया देशमुखने श्रद्धांजली पोस्ट शेअर केली आहे. अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, प्राजक्ता गायकवाड, अनघा अतुल, मृणाल ठाकूर, माधुरी दीक्षित, आदिनाथ कोठारे, कपिल होनराव या कलाकारांनीही आपल्या भावना या घटनेनंतर व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – तीन लग्न, हृदयविकाराच्या झटक्याने निधन अन्…; करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती घटस्फोटामुळे राहिलेले चर्चेत, कोण होते संजय कपूर?

तर अंकिता लोखंडे, गौतमी देशपांडे, प्रथमेश लघाटे, समृद्धी केळकर, शंतनू गांगने या कलाकारांनीही स्टोरी पोस्ट करत या घटनेवर भाष्य केलं आहे. अहमदाबाह येथे घडलेल्या या घटनेमुळे अनेकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, या घटनेचा शोक व्यक्त करत हेमंत ढोमेने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलंय की, “अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी अतिशय हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेत ज्या लोकांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. त्यांचे कुटुंबीय, या अपघातातील जखमी आणि सर्व प्रभावित लोक यांच्याबद्दल मनापासून सहवेदना ! या कठीण काळात माझ्या प्रार्थना त्या सर्वांसोबत आहेत”.

Tags: ahmedabad plane crashmarathi celebrityplancrash
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
shashank ketkar angry on double parking

“भारतात माणसाचं आयुष्य स्वत, शुन्य किंमत”, पार्किंगवरुन भडकला शशांक केतकर, चीड आणणारा Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.