Marathi Actor Visited Maha Kumbh Mela : प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. सध्या प्रयागराजमध्ये दुर्मीळ महाकुंभ मेळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. हा मेळा १३ जानेवारीपासून सुरु होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, यावेळी तो अधिक विशेष आहे, कारण १४४ वर्षांनंतर होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सगळेचजण या कुंभमेळ्याकडे डोळे लावून बसले आहेत. यंदाच्या हा महाकुंभ मेळ्याला केवळ सर्वसामान्य भाविक, साधू-संत नाही तर कलाकार मंडळींचाही वावर पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकार मंडळींची पावले तर या कुंभमेळ्याकडे वळली आहेत.
राजकीय क्षेत्रातील दिग्गज कलाकार मंडळींची तसेच अनेक कलाकारांची या मेळ्याला उपस्थिती असणार आहे. अशातच मराठमोळा अभिनेताही या खास मेळ्यासाठी थेट प्रयागराजला पोहोचला आहे. हा अभिनेता म्हणजे मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा सौरभ चौगुले. सौरभने महाकुंभ मेळ्याला हजेरी लावायला प्रयागराजला भेट दिली आहे. सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत त्याने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात डोहाळे जेवण, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर. २०२५ च्या १४४ वर्षाने येणाऱ्या महाकुंभ मेळ्याचा साक्षीदार होण्याचा संयोग, हे खरंच भाग्याचं आहे…” हर हर गंगे, हर हर महादेव!!”, असं कॅप्शन देत त्याने थेट कुंभमेळ्यातील फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने कुंभमेळ्याची खास झलकही दाखवली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट अनेकांनी त्यांचं कौतुक केले आहे. तर काहींनी, भाग्यवान आहे असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. सौरभ प्रयागराज एक्स्प्लोर करताना दिसत आहे.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ चौघुले घराघरांत लोकप्रिय झाला. त्यानंतर तो त्याच्या लग्नामुळे चर्चेत राहिला. सौरभ चौघुले व योगिता चव्हाण यांचा अगदी थाटामाटात शुभविवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. त्यानंतर सौरभ व योगिता यांनी मुंबईत नवं घर घेतलं असल्याचं पाहायला मिळालं.