तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो इधर है’, हे गाणं सगळ्यांनाच माहीत असेल. २०१४ साली आलेल्या ‘मै तेरा हीरो’ या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली. वरुण धवन, ईलियाना डिक्रूज व नर्गिस फाकरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. रोमॅंटिक कॉमेडी चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. यामध्ये वरुण, नर्गिस व इलियाना यांच्या प्रेमाचा त्रिकोण यामध्ये बघायला मिळाला. आता या चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटादरम्यानचा एक बीटीएस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची चर्चा सर्वत्र होत असलेली बघायला मिळत आहे. ( varun dhawan-nargis farkri viral video)
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वरुण व नर्गिस यांचा एक रोमॅंटिक सीन बघायला मिळत आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये वरुण नर्गिसला किस करताना दिसत आहे. यावेळी सीन संपल्यानंतर दिग्दर्शक कट कट बोलताना दिसत आहेत. मात्र तरीही हा सीन करताना अभिनेता थांबत नाही आणि पुढे तसाच अभिनय सुरु ठेवतो. त्याच वेळी नर्गिस हसू लागते. त्यानंतर क्रू मेंबरदेखील हसू लागतात.
This Creep #VarunDhawan always crosses boundaries with Actresses.
— Asad (@KattarAaryan) January 12, 2025
Director said CUT and he is still going on🥴 eww pic.twitter.com/uHR8n4YuGV
वरुणचा हा व्हिडीओसमोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “ठरक, ठरकी, ठर्कुल्ला”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “ओव्हर अक्टिगचं दुकान आणि निर्लज्ज”. तिसऱ्या एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “याला बॉलिवूडमधून बाहेर काढा. खूप नाव खराब केले आहे”. तसेच अजून एकाने लिहिले की, “याला बॉलिवूडमध्ये बंदी घातली पाहिजे”. दरम्यान नर्गिसचा एक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये नर्गिसने वरुणबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली की, “मला वाटतं की सेटवर मला वरुणबरोबर जास्त धमाल आली. तो मुळात खूप एनर्जेटिक व खूप सकारात्मक आहे. तो खूप विनोदी आहे”. वरुणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा आता ‘बेबी जॉन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र या चित्रपटाला हवे तसे यश मिळू शकले नाही.