अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या अभिनयाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. संकर्षण मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. संकर्षणच्या प्रत्येक कलाकृतीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. प्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये संकर्षण कऱ्हाडेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अभिनयाच्या जोरावर संकर्षणने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच तो करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. (Sankarshan Karhade Photoshoot)
संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून तो नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. हल्ली संकर्षण मालिकाविश्वातून काढता पाय घेत नाटकविश्वाकडे वळला आहे. नाटकांच्या प्रयोगांदरम्यान तो सध्या विविध ठिकाणी दौरे करताना दिसत आहे. यावेळी त्याने नाटकांच्या प्रयोगादरम्यान आलेले अनेक अनुभवही वेळोवेळी शेअर केले आहेत. त्याच्या या आगळ्यावेगळ्या पोस्ट प्रेक्षकांनाही विशेष भावतात.
अशातच संकर्षणच्या नेहमीपेक्षा एका वेगळ्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन एक पोस्ट शेअर करत, फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. आणि त्याखाली गमतीशीर कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “हा मी आहे का? मी या फोटोशूटच्या निमित्ताने असा पहिल्यांदा उभा राहिलो. तसे माझे पाय जमिनीवर आहेत पण थोडे हवेत गेले की फोटो चांगला येतो असं सांगण्यात आलं. म्हणुन ही पोज दिली, बरं वाटतंय का?” असं म्हणत त्याने रंगीबेरंगी कपड्यांतील फोटो शेअर केला आहे. यावेळी अभिनेत्याने दिलेली खास पोज साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
संकर्षणने खास पोज देत शेअर केलेल्या या फोटोवर ही पोज बरी दिसत आहे का? असा सवाल केला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिलेल्या पाहायला मिळत आहेत. संकर्षणच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने हार्ट ईमोजी शेअर केली आहे. तर अनेकांनी खूप छान दिसतंय अशी कमेंट केली आहे.