मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर खळबळ, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “अजून किती…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 9, 2024 | 1:28 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Actress Anagha Atul expressed her reaction to the shooting attack incident of Abhishek Ghosalkar post shared on social media.

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर खळबळ, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "अजून किती..."

नुकत्याच झालेल्या गोळीबारांच्या घटनेमध्ये कल्याणनंतर आता दहीसरमधील गोळीबार घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिसभाई दोघांचाही मृत्यू झाला आहे.

आरोपी मॉरिस भाईने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटद्वारे लाईव्ह येत त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. त्यानंतर अभिषेक घोसाळकर आपली भूमिका मांडतात आणि मग घोसाळकर यांचं बोलणं संपल्यानंतर ते जागेवरुन उठताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात येतो. अभिषेक यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर मॉरिस भाईने स्वत:वरही काही गोळ्या झाडल्या.

या प्रकरणावर राजकीय, सामाजिक तसेच अनेक स्तरारून प्रतिक्रिया उमटत असतानाच कला क्षेत्रातूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनघा अतुलने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनघाने तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल दु:ख, संताप व शोक व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “ब्रेकअपबद्दल बोलणं…”, एक्स गर्लफ्रेंडने बदनामी केल्यानंतर भडकला अरबाज खान, म्हणाला, “२ वर्षांपूर्वीच…”

अनघाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिषेक घोसाळकर यांच्या गोळीबाराच्या घटनेचे वृत्त शेअर करत “आपल्या आजूबाजूला हे काय घडत आहे. अशा बातम्या पाहून मी अस्वस्थ होते” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर “अशा घटनांकडे आपण अजून किती दुर्लक्ष करणार?” असा प्रश्नही तिने या माध्यमातून उपस्थित केला आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनंतर रिचा चड्ढा व अली फजल आई-बाबा होणार, हटके अंदाजात सांगितली गरोदर असल्याची बातमी, म्हणाले, “आता आम्ही…”

दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सतत अशा गोळीबाराच्या घटना घडत असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. .

Tags: ठाकरे गट माजी नगरसेवकगोळीबार हल्लाअनघा अतुलअभिषेक घोसाळकर गोळीबारअभिषेक घोसाळकर गोळीबार मृत्यूअभिषेक घोसाळकर गोळीबार दुर्घटनामराठी अभिनेत्रीब्रेकिंग बातमीAbhishek Ghosalkar ShootingAbhishek Ghosalkar Shooting AccidentAbhishek Ghosalkar Shooting Deathanagha atulBreaking Newsmarathi actressShooting AttackThackeray Group Ex Corporator
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Bhabi ji ghar par hai fame actress shubhangi atre on the path of spirituality after separating from husband

१९ वर्षांचा संसार मोडला, एक मुलगी अन्...; घटस्फोटानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने निवडला अध्यात्मचा मार्ग, आश्रमातील व्हिडीओ केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.