रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सत्यनारायण पूजा अन् पारंपरिक अंदाज; लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर, घराचीही दिसली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 3, 2024 | 12:12 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Weddin

सत्यनारायण पूजा अन् पारंपरिक अंदाज; लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर, घराचीही दिसली झलक

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असतानाच प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब विवाहबंधनात अडकला. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधत त्यांच्या आयुष्यातील एका नव्या वेगळ्या वळणावर पाऊल टाकलं आहे. प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नसोहळ्यातील धमाल, मस्तीचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल झाले. अत्यंत साधेपणानं व पारंपरिक अंदाजात प्रथमेश व क्षितिजा यांचा लग्नसोहळा संपन्न झाला. दोघांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास लूकचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. (Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding )

प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुड्याचे, हळदी व मेहंदीचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर ही जोडी छोटासा ब्रेक घेत पुण्यातील लोणावळा येथे फिरायला देखील गेलेली पाहायला मिळाली. लोणावळा येथे एन्जॉय करतानाचे खास फोटोही त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले होते. सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या त्यांच्या एका पोस्टाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. प्रथमेश व क्षितिजा यांनी त्यांच्या सत्यनारायणाच्या पूजेचा खास फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील सोनूची लगीनघाई सुरु, लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात, नवरा, सासू-सासऱ्यांसह पोज देत फोटो काढले अन्…

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

सासरी गेल्यानंतर क्षितिजा परबांच्या घरी रमलेली पाहायला मिळाली. तुळशी वृंदावनाचं डेकोरेशन करत त्यांनी सत्यनारायणाची पूजा त्यात मांडली होती. दोघांनी हात जोडून नमस्कार करतानाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी क्षितिजा व प्रथमेश यांचा पारंपरिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. क्षितिजाने यावेळी हिरव्या रंगाची काठापदराची सुंदर अशी साडी नेसली होती तर प्रथमेश हिरव्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये दिसला. शिवाय त्यांनी त्यांच्या सत्यनारायणाच्या पूजेवेळी परब व घोसाळकर कुटुंबीयांचा एकत्र फॅमिली फोटोदेखील शेअर केला. यावेळी प्रथमेशच्या घराची छोटीशी झलकही पाहायला मिळाली.

आणखी वाचा – ठाण्यात सुरु केलं नवं क्लिनिक, बायकोचं यश पाहून भारावला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे, कौतुक करत म्हणाला, “नवीन सुरुवात…”

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

समोर आलेल्या फोटोंमध्ये प्रथमेशचं घर खूपच सुंदर दिसत होतं. दरम्यान प्रथमेशच्या घरातील देवघराची छोटीशी झलक पाहायला मिळाली तसेच प्रथमेशने लग्नानंतरच्या काही विधींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशने त्याच्या घराच्या एका कोपऱ्यात त्याला मिळालेल्या पुरस्कारांचा संच केलेला पाहायला मिळाला. प्रथमेशने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची कायमच मन जिंकली आहेत.

Tags: entertainmentmarathi actorPrathamesh Parab Kshitija Ghosalkar homePrathamesh Parab Kshitija Ghosalkar traditional lookPrathamesh Parab Kshitija Ghosalkar wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Jhalak Dikhhla Jaa 11 Winner Manisha Rani

बिहारची मुलगी मनीषा राणीने पटकावलं ‘झलक दिखला जा ११’चं विजेतेपद, ट्रॉफीसह मिळाले इतके लाख रुपये

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.