‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेने आजवर प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करत रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. या मालिकेतील लहान सोनू भिडेची भूमिका साकारणारी झील मेहता आता मोठी झाली आहे आणि लवकरच ती लग्न करणार असल्याची गुडन्यूज समोर आली आहे. दरम्यान, झीलच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. व्याही भोजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला असून याचे खास फोटो समोर आले आहेत. (Jheel Mehta Wedding)
झील मेहता तिचा बॉयफ्रेंड आदित्य दुबेसह लग्न करणार आहे. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. अखेर बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी त्यांच्या आयुष्यातील एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. झील मेहताच्या लग्नापुर्वीच्या विधींच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. झील मेहताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नापुर्वीच्या विधींचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी झीलने फिकट निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर आदित्यनेही झीलला मॅचिंग कपडे परिधान केले होते. दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे. झील मेहतानेही तिच्या सासू -सासऱ्यांसह पोज दिली.
लग्नापुर्वीच्या विधींचे खास फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “नवीन सुरुवात आणि नवीन फोटो”. झील मेहताने असेही सांगितले की, तिने तिच्या लग्नापुर्वीच्या विधींसाठी स्वतःचा मेकअप स्वतः केला होता. हा सोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. झीलने अलीकडेच सांगितले होते की, ती व आदित्य दुबे हे बालपणीचे मित्र आहेत. दोघेही एकाच शाळेत शिकले. झील व आदित्य यांची दहावीत मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. झील मेहता आता पेशाने मेकअप आर्टिस्ट आहे. तिच्या आईबरोबर ती या क्षेत्रात कार्यरत आहे. तिची आई हेअर स्टायलिस्ट आहे.
झील मेहता हिने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या ९व्या वर्षी तिने तिची पहिली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ केली. पुढे शिक्षण घेण्यासाठी झीलने या मालिकेतून ब्रेक घेतला. झील मेहताचा होणार नवरा आदित्य दुबे हा व्यवसायाने व्हिडीओ कंटेंट क्रिएटर आहे.