शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ठाण्यात सुरु केलं नवं क्लिनिक, बायकोचं यश पाहून भारावला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे, कौतुक करत म्हणाला, “नवीन सुरुवात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 3, 2024 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dattu More On Wife

ठाण्यात सुरु केलं नवं क्लिनिक, बायकोचं यश पाहून भारावला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे, कौतुक करत म्हणाला, "नवीन सुरुवात…"

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे. ‘वन अँड ओन्ली’ अशी ओळख असलेल्या दत्तूने आजवर त्याच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या दत्तूने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना सुखद धक्का दिला. दत्तूने काही दिवसांपूर्वीच विवाह बंधनात अडकला. त्याच्या लग्न सोहळ्याचे खास फोटो त्यांने सोशल मीडियावरुन शेअर करत ही गुडन्यूज त्याने दिली. (Dattu More On Wife)

अचानक समोर आलेल्या दत्तूच्या लग्नाच्या बाबतीतल्या निर्णयामुळे साऱ्यांनाच धक्का बसला होता. कारण यापूर्वी दत्तूने त्याच्या लग्नाबाबत, त्याच्या पत्नीबाबत कोणताच खुलासा केला नव्हता. अत्यंत साधेपणाने कोणताही थाटमाट न करता दत्तूचा लग्नसोहळा पार पडला. दत्तूच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. तसेच दत्तूच्या लग्नाच्या प्री-वेडिंगची बरीच चर्चा रंगली. आजवर दत्तूच्या विनोदांना रसिकांचे भरपूर मनोरंजन केलं आहे. त्याचा मिश्किलपणा, खट्याळ प्रवृत्ती ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत आहे. दत्तू मंचावर आला की विनोदाची आतिषबाजी होते.

आणखी वाचा – Video : अशीही सेवा! विमानामध्ये राम चरणने बायकोच्या पायाला केलं मालीश, व्हिडीओ बघताच नेटकरी म्हणाले, “यांना पुरस्कार द्या…”

View this post on Instagram

A post shared by Datta More (@dattamore2870)

सोशल मीडियावरही दत्तू बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच दत्तूने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. दत्तूने त्याची ही पोस्ट त्याच्या बायकोच्या कौतुकास्पद शेअर केली आहे. दत्तू मोरेची बायको स्वाती घुनागे ही पेशाने डॉक्टर आहे. स्वाती ही व्यवसायाने डॉक्टर असून ती स्त्रीरोग तज्ञ असून तिचं पुण्यात स्वत:चं क्लनिक आहे. स्वाती ही डॉक्टर असल्याबरोबरच अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते. अशातच स्वातीच्या नव्या सुरुवातीबाबत, आयुष्यात टाकलेल्या एका नव्या पाऊलाबाबत दत्तूने खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : लेकाचं बोलणं ऐकून भर कार्यक्रमातच रडू लागले मुकेश अंबानी, अनंतचेही डोळे पाणावले, आई स्टेजवर आली अन्…; Inside Video व्हायरल

दत्तूच्या पत्नीने ठाण्यात तिचं नवं क्लिनिक सुरु केलं आहे. बायकोच्या या निर्णयाचं भरभरुन कौतुक करणारी पोस्ट त्याने इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने बायकोबरोबर क्लिनिक बाहेरचे फोटो शेअर केले आहेत, यांसह कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे की, “आयुष्य कितीही कठीण वाटत असले तरी तुम्ही सोप्प करु शकता आणि यशस्वी होऊ शकता. घुनागे हॉस्पिटलनंतर बायकोचं ठाण्यातील पहिलं क्लिनिक. अजून एक नवीन सुरुवात. प्रिय बायको, तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम” असं म्हणत त्याने बायकोचं कौतुक करत तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Tags: dattu moredattu more marriagedattu more wifedattu more wife informationentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Mugdha Vaishampayan story

Video : समुद्र किनाऱ्यावर धमाल, मस्ती अन्…; अंदमानात रमलीय मुग्धा वैशंपायन, म्हणाली, "मोह आवरला नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.