शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला कोणताही पश्चात्ताप नाही”, लग्नाच्या तीन वर्षांतच संसार मोडला, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 17, 2026 | 9:41 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hansika Motwani breaks silence on divorce

"मला कोणताही पश्चात्ताप नाही", लग्नाच्या तीन वर्षांतच संसार मोडला, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…

Hansika Motwani breaks silence on divorce  : सिनेविश्वात काम करत असताना अनेक कलाकार सहकलाकारासह रिलेशनमध्ये येतात. चित्रपटसृष्टीत नाती जुळून येणे ही अलीकडे एक सामान्य गोष्ट आहे. अशातच सिनेसृष्टीतील एक जोडपं लग्नाच्या तीन वर्षांनी वेगळं झालं असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानीचा सोहेल कथुरियासोबतचा तीन वर्षांचा विवाह संपुष्टात आला. ११ मार्च २०२६ रोजी, मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने हंसिका मोटवानी आणि व्यावसायिक सोहेल कथुरिया यांना परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला. या जोडप्याने डिसेंबर २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते, परंतु परस्पर मतभेदांमुळे ते जुलै २०२४ पासून वेगळे राहत होते. आता त्यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे. हंसिकाने या घटस्फोटावर अखेर मौन सोडले आहे.

हंसिकाने घटस्फोटावर थेट भाष्य केलेले नाही, पण अलीकडेच ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. हंसिका म्हणाली, “माझे कुटुंब माझ्यावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकत नाही. लोकांना सनसनाटी बातम्या हव्या होत्या, आणि त्या त्यांना मिळाल्या. त्यांना मथळे हवे होते, आणि तेही त्यांना मिळाले. मी याबद्दल कधीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि देणारही नाही, कारण मला त्याची पर्वा नाही. सर्व काही ठीक आहे. मला कोणताही पश्चात्ताप नाही. जर तुम्ही चुकीच्या मार्गावर गेला असाल, तर त्रास सहन करण्यापेक्षा त्यातून उतरणेच चांगले. त्यामुळे, काहीही झाले तरी, सर्व काही ठीक आहे. मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. मला कोणताही पश्चात्ताप नाही. त्यामुळे, मी जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे”.

आणखी वाचा – अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…

हंसिकाने लग्न आणि मातृत्व यांसंबंधीच्या सामाजिक अपेक्षांवरही भाष्य केले आणि महिलांना ठराविक कालमर्यादेचे पालन करण्यास का भाग पाडले जाते, असा प्रश्न उपस्थित केला. ती अभिनेत्री म्हणाली, “मला माहीत नाही… माझ्या बाबतीत असं कधी घडलं नाही. ‘तू या वयाला पोहोचली आहेस, आता लग्न करायला हवं,’ असं लोकांनी मला कधीच सांगितलं नाही. आजकाल तुम्ही काय करायला हवं, याबद्दल अनेक लोक सल्ला देतात. पण आजच्या मुली इतक्या सक्षम आणि स्वतंत्र आहेत की, त्या स्वतःसाठी जे योग्य आहे तेच करतात”. ती पुढे म्हणाली, “पूर्वी लोक म्हणायचे, ‘२५ व्या वर्षी लग्न करा,’ मग ३० व्या वर्षी, आता ४० व्या वर्षी म्हणतात. हे लोक कोण आहेत? लग्नानंतरही ते म्हणतात, ‘आता मूल जन्माला घाला.’ पण जर ते योग्य वाटत नसेल, तर घालू नका. एवढा दबाव का घ्यायचा?”.

Tags: divorcehansika motwani
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Bollywood casting meeting controversy
Entertainment

ऑडिशनला बोलावलं, चुकीचा स्पर्श केला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “त्याने अनेक महिलांना…”

एप्रिल 17, 2026 | 10:20 am
Hansika Motwani breaks silence on divorce
Entertainment

“मला कोणताही पश्चात्ताप नाही”, लग्नाच्या तीन वर्षांतच संसार मोडला, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…

एप्रिल 17, 2026 | 9:41 am
Dnyanada Ramtirthkar Kelvan
Entertainment

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…

एप्रिल 16, 2026 | 1:50 pm
Next Post
Bollywood casting meeting controversy

ऑडिशनला बोलावलं, चुकीचा स्पर्श केला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, "त्याने अनेक महिलांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.