बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘’बिग बॉस मराठी’ फेम माधव देवचकेची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री, वकिलाच्या भूमिकेत दिसणार, नवा लूक समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 8, 2024 | 2:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhav Deochake Comeback

‘'बिग बॉस मराठी’ फेम माधव देवचकेची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री, वकिलाच्या भूमिकेत दिसणार, नवा लूक समोर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे अभिनेता माधव देवचके प्रसिद्धीस आला. माधवने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय माधवने चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र ‘बिग बॉस’ मराठीमुळे माधव खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचला. मात्र ‘बिग बॉस’नंतर माधव तितकासा सिनेसृष्टीत दिसला नाही. अशातच आता माधवने छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं असल्याचं समोर आलं आहे. (Madhav Deochake Comeback)

स्टार प्रवाह वाहिनीच्या अबोली या मालिकेतून माधवने मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे. अबोली मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा अबोलीने घेतलेला वसा अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. नवनव्या केसचा छडा लावत असतानाच आता अबोलीच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचं नाव आहे श्रेयस सुमन मराठे असे आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम सोढी आधी होता बेपत्ता, आता प्रकृती बिघडली, वडिलांना राहवेना, म्हणाले, “मोबाईलही बंद केला आणि…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके श्रेयस सुमन मराठे हे पात्र साकारणार आहे. अबोलीच्या विरोधात श्रेयस केस लढणार आहे. या नव्या आव्हानाचा अबोली व अंकुश कसा सामना करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. याआधी देवयानी व गोठ या मालिकेत माधवने लक्षवेधी भूमिका साकारली होती. श्रेयस सुमन मराठे ही व्यक्तिरेखा देखील हटके असणार असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रेयसचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे नावाबरोबरच तो आईचही नाव लावतो.

आणखी वाचा – लग्नानंतर बायकोसह नेपाळला पोहोचला प्रथमेश लघाटे, पारंपरिक नव्हे तर मुग्धा वैशंपायनच्या मॉर्डन लूकने वेधलं लक्ष, धमाल-मस्ती अन्…

अतिशय हुशार, यशस्वी व हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणारा श्रेयस अबोली-अंकुशच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ घडवणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: madhav deochakeMadhav Deochake Comebackmarathi actormarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
kangana on slap controversy

कंगना रणौतने स्वतःवर झालेल्या हल्ल्याची बलात्काराशी केली तुलना, अभिनेत्री पुन्हा बरळली, म्हणाली, "तुमचं मानसिक आरोग्य…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.