बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर बायकोसह नेपाळला पोहोचला प्रथमेश लघाटे, पारंपरिक नव्हे तर मुग्धा वैशंपायनच्या मॉर्डन लूकने वेधलं लक्ष, धमाल-मस्ती अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 13, 2024 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
लग्नानंतर बायकोसह नेपाळला पोहोचला प्रथमेश लघाटे, पारंपरिक नव्हे तर मुग्धा वैशंपायनच्या मॉर्डन लूकने वेधलं लक्ष, धमाल-मस्ती अन्...

लग्नानंतर बायकोसह नेपाळला पोहोचला प्रथमेश लघाटे, पारंपरिक नव्हे तर मुग्धा वैशंपायनच्या मॉर्डन लूकने वेधलं लक्ष, धमाल-मस्ती अन्...

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरांत लोकप्रिय झालेले गायक-गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. आपल्या सुमधूर आवाजाने प्रथमेश-मुग्धा यांनी आपल्या रसिक श्रोत्यांची मनं जिंकली आहेत. मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मुग्धा व प्रथमेशच्या परदेशात गेले असून सोशल मीडियावर त्यांनी आपले खास फोटो शेअर केले आहेत.

मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाला आता पाच महिने पूर्ण झाले असून दोघं आता परदेशवारी करत आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दोघांनी आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्या गाण्याच्या कार्यक्रमांमधून वेळ काढत हे दोघे परदेशात गेले आहेत. मुग्धाने दोन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरील कॉफी मगचे फोटो शेअर करत खूप गरजेच्या व खूप दिवसांपासून वाट बघत असलेल्या प्रवासाला जात असल्याचे म्हटले होते. मात्र यातून हे दोघे कुठे जात होत याबद्दल सांगितले नव्हते.

आणखी वाचा – पाचव्या पेटीतली कट्टयार रुपालीच्या हाती, विरोचकाच्या नव्या खेळीचा नेत्रा-अद्वैतला संशय, कोणती नवी चाल खेळणार?  

अशातच प्रथमेशने नेपाळच्या निसर्गसौंदर्याचा फोटो शेअर करत ते नेपाळला गेले असल्याचे दिसत आहे. “हे नेपाळ” असं म्हणत तिने ते राहत असलेल्या हॉटेलच्या लोकेशनचाही उल्लेख केला आहे. दोघे नेपाळच्या भक्तपूरमध्ये भटकंती करत असून याचे खास फोटो प्रथमेश त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत. यातील काही फोटोमध्ये दोघांचा मॉडर्न लूकही पाहायला मिळत आहे. ‘नेपाळ डायरी’ असं म्हणत त्याने हे खास फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – कंगणा रणौतला कानाखाली मारलेल्या CISF महिलेच्या मदतीसाठी धावले लोक, कुणाकडून नोकरीची ऑफर तर कुणाकडून कायदेशीर मदत

दरम्यान, ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या आणि २१ डिसेंबरला त्यांनी लग्नगाठ बांधून त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

Tags: marathi entertainment newsmugdha vaishampayanMugdha Vaishampayan Prathesh Laghate Nepal Photos Marathi NewsPrathesh Laghate
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
ibrahim khan drunk video

Video : "हा नशेतच आहे", पार्टीमधून बाहेर पडताना सैफ अली खानच्या मुलाचा गेला तोल, चालताही येईना, नशा की आणखी काही?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.