मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे सदाशिव अमरापुरकर. या अभिनेत्याबाबत नुकतीच एक बातमी समोर आली आहे. दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागली आहे. अहमदनगर मधील त्यांच्या फ्लॅटला अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली. फ्लॅटला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमनदलाचे कर्मचारी वेळेत पोहोचल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. त्यांच्या फ्लॅटला शॉटसर्किटमुळे आग लागली होती. सुनंदा सदाशिव अमरापुर यांच्या नावाने असलेल्या या फ्लॅटमध्ये ज्योती भोर पठाणे या भाडेकरू राहत होत्या. या घटनेत ज्योती अडकल्या होत्या. या आगीच्या धुराचा त्यांना त्रास झाला. त्यांना अग्निशमनदलाच्या जवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून उपचारांसाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फ्लॅटला १२ डिसेंबर २०२३ रोजी (मंगळवार) दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश असून या आगीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता, तो धूरही नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
आणखी वाचा – “आम्ही लग्न करण्याचा प्लॅन…”, पूजा सावंतने केला लग्नाच्या तारखेबाबत खुलासा, म्हणाली, “दोघांचे कुटुंब…”
दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या दमदार खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. २०१४ साली सदाशिव अमरापूरकर यांचं वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं. त्यांना फुफ्फुसासंबंधी आजार झाला होता. ३ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.