आपल्या सहजसुंदर अभिनयाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘कलरफूल’ या नावाने पूजा संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. पूजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच काही दिवसांपूर्वी तिने बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणबरोबरचा फोटो शेअर करत तिच्या रिलेशनविषयी सांगितले. बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला होता. (Pooja Sawant Interview)
पूजाने सुरुवातीला सिद्धेशबरोबरचे पाठमोरे फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे पूजाचा बॉयफ्रेंड नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिने त्याच्याबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्याविषयी खुलासा केला आणि यामुळे दोघांच्या नात्याविषयी सर्वांनाच माहीत झाले. पूजा नुकतीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबासह फिरायला गेली होती. याचे काही खास क्षणही तिने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले होते.
आणखी वाचा – “ते हवे होते कारण…”, ऋषी कपूर यांच्या आठवणीत शक्ती कपूर भावुक, म्हणाले, “माझ्या कुटुंबाचे संबंध…”
बोयफ्रेंडबरोबरचे फोटो पोस्ट केल्याने अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. पूजाने नुकतीच तिच्या आगामी ‘मुसाफिरा’ चित्रपटाच्या म्युजिक लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हा मुलाखती दरम्यान तिने लग्नाबद्दल भाष्य केले आहे. यावेळी मुलाखतीमध्ये पूजा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने “आम्ही लवकरच लग्न करण्याचा प्लॅन करत आहोत. आम्हा दोघांचे कुटुंब आमच्या लग्नाबाबत चर्चाही करत आहेत. या चर्चादरम्यान आमच्या कुटुंबांकडून जशी तारीख ठरेल तसं मी लगेचचं सगळयांना लग्नाबद्दल सांगेन” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – “नवऱ्याबरोबर ‘बिग बॉस’मध्ये जाऊ नकोस”, चाहतीने सल्ला देताच सोनाली कुलकर्णीचे उत्तर, म्हणाली, “तिथे कधीच…”
दरम्यान, लवकरच पूजाचा ‘मुसाफिरा’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पूजासह पुष्कर जोग, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा व दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. तसेच पूजा विवाहबंधनात कधी अडकणार? यासाठीही तिचे अनेक चाहते आतुर आहेत हे नक्की.