सध्या सिनेसृष्टीत मराठी चित्रपटांची रांग लागली आहे. एकामागोमाग एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज होत आहेत. अशातच आणखी एका बिग बजेट चित्रपटाची यांत एंट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. लवकरच हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. या ट्रेलर लॉंच सोहळ्याला माधुरी दीक्षित हिने तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह हजेरी लावली होती. (Panchak Movie Trailer)
डॉ. श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – सदाशिव अमरापुरकर यांच्या घराला आग, एक जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, अन्…
चित्रपटाच्या ट्रेलरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रेलरमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “त्या घरामध्ये अचानक वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. घरातील एक एक माणूस मृत्यूमुखी पडत आहे. मात्र हे सगळं का आणि कसे होत आहे याविषयी कुणालाच माहिती नाही. घरात पंचक लागल्याने आता पुढील नंबर कोणाचा लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असताना प्रत्येक जण यावर उपाय शोधत आहे.
आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे पाहून रंजक ठरणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.