अभिनेता कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे. तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील तितकाच गंमतीशीर आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी आलाच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महराष्ट्रात लोकप्रिय झाला आहे. या शोमधून विनोदी स्किट्स करत त्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. कुशल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच कुशलने शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. (Kushal Badrike On Instagram)
कुशलचा सुयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा मित्र-मैत्रिणीचे नाते असल्याचे कायमचं पाहायला मिळाले आहे आणि हे खास नाते त्यांच्या अनेक व्हिडीओमधून दिसते. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.
कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याची पत्नी गाडी चालवत आहे आणि ती गाडी चालवत असताना ती नृत्याचा सराव करत आहे. सुनयना ही एक उत्तम कथ्थक नृत्यांगना असल्याचे सर्वांनाच माहीत आहे आणि याच संबंधित ती गाडी चालवत असताना हातांनी गाण्याच्या तालाचा ठेका धरत आहे. कुशलने त्याच्या पत्नीचा गाडी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत “मी काय म्हणतो, उगाच माझ्या जीवाशी खेळ का? मला तरी गाडी चालवू दे” असं म्हटलं आहे.
पण खरी गंमत तर यापुढे आहे. कुशलन हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताच त्याच्या बायकोने त्याला रागावून “हा व्हिडीओ ताबडतोब डिलीट कर” असं म्हटलं आहे. पण कुशलनेही “मी व्हिडीओ डिलिट करणार नाही” असं म्हणत तिला उत्तर दिलं आहे. यावर कुशलची बायको त्याच्यावर चांगलीच रागावली असल्याचे पाहायला मिळत आहे.