शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अप्पी-अर्जुन एकत्र येण्यासाठी अमोलचं छत्रपती शिवाजी महाराजांना गाऱ्हाणं, हातही जोडले, एकत्र येणार का?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 8, 2024 | 11:03 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector marathi serial new promo Amol prays to Chhatrapati Shivaji Maharaj for Appi-Arjun to come together

अप्पी-अर्जुन एकत्र येण्यासाठी अमोलचं छत्रपती शिवाजी महाराजांना गाऱ्हाणं, हातही जोडले, एकत्र येणार का?

‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिकाही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत. काही वर्षांचा लीप घेत ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत अप्पी व अर्जुन यांची ताटातूट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र आता सात वर्षांनंतर अप्पी व अर्जुन एकमेकांसमोर येणार आहेत.

नुकताच काल (७ मे) रोजी या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये अप्पी व अर्जुन यांची भेट होताना पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पहायला मिळत आहे की, अमोल व अप्पी फिरायला जातात तेव्हा अमोलची टोपी खाल पडते. ती आणायला अप्पी खाली येते. टोपी उचलल्यानंतर अप्पीचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि तिला आधार देतो. तब्बल सात वर्षांनी अप्पी व अर्जुन यांची भेट झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – चैतन्यने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य साक्षीला सांगितल्याचा अर्जुनसमोर केला खुलासा, सायली प्रेमात आकंठ बुडाली अन्…

अशातच आता आणखी एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अमोल त्याच्या आई-वडिलांची  भेट व्हावी म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्याचं गाऱ्हाणं मांडताना दिसत आहे. यावेळी अमोल गोळेवाल्याला “काका तुम्ही आज महाराजांकडे काय मागितलं?” असं विचारतो आणि गोळेवाला अमोलला उत्तर देत असं म्हणतो की, “महाराजांना रयतेच्या मनातल्या सगळ्या गोष्टी कळतात. आपल्या महाराजांना रयतेचा राजा म्हणायचे. त्यांनी लोकांची कामे केली. त्यांच्या अडचणी सोडवल्या. त्यांच्यामुळे आपण आहोत, तर त्यांना आपल्या मनातलं कळणार नाही का?”

आणखी वाचा – सर्वार्थ सिद्धी योगामुळे मेष व कर्क राशीसह ‘या’ पाच राशींचे भाग्य उजळणार, आर्थिक लाभाच्या संधी मिळतील, जाणून घ्या…

यानंतर मग अमोल महाराजांसमोर हात जोडून उभा राहतो आणि “इथे बाबांबद्दल कुणाला सांगावं ही मला कळतच नाही. मला माझ्या बाबांना भेटायचं आहे, कृपया मला त्यांना भेटवा” असं म्हणतो आणि त्यांच्या पाया पडतो. अशातच अप्पी-अर्जुन यांची भेटही होतानाचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अमोलमुळे अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का? त्यांच्यात अमोलमुळे पुन्हा पूर्वीसारखे नाते निर्माण होणार का? हे पाहण्यासाठी मालिकेचे प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. मालिकेत पुढे काय होणारहे पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता लागून राहिली आहे.           

Tags: Appi Amchi Collectormarathi entertainment newsmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
 Divyanka Tripathi Discharged From Hospital
Entertainment

सासूने नजर काढली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दाखविली जुळ्या मुलांची पहिली झलक, १० वर्षांनी झाली आई

मे 30, 2026 | 10:03 am
Next Post
Gaurav More Exit From MHJ

"खूप वाईट वाटतंय आणि…", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची कायमची एक्झिट, शो सोडल्यानंतर म्हणाला, "माफी मागतो कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.