सध्या सर्वत्र सानिया मिर्झा व शोएब मलिक यांची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक व भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. २०१० मध्ये विवाहबद्ध झालेले हे प्रसिद्ध जोडपे लग्नाच्या १४ वर्षानंतर वेगळे झाले आहेत. शोएबच्या कौटुंबिक सूत्रांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. घटस्फोटानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसह लग्न केले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएबचे हे तिसरे लग्न आहे. सानियापूर्वी शोएबने आयशा सिद्दीकीशी लग्न केले होते. (shoaib Malik and sania Mirza Divorce)
शोएब मलिकच्या कौटुंबिक सूत्रांवर विश्वास ठेवला तर, क्रिकेटरने टेनिसपटू सानिया मिर्झाला घटस्फोट दिला आहे. सानिया व शोएब परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे झाले असल्याचं समोर आलं आहे. शोएब मलिक व सानिया मिर्झाला एक मुलगा आहे. इझान असे त्या मुलाचे नाव आहे. इझान दुबईत राहणार असल्याचंही समोर आलं आहे. समोर आलेल्या सूत्रानुसार, सानिया व शोएब दोघे मिळून त्यांच्या मुलाची जबाबदारी घेणार आहेत.
सानिया मिर्झाबरोबरच्या घटस्फोटानंतर शोएब मलिकने १८ जानेवारी २०२० रोजी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. लग्नानंतर दोन दिवसांनी दोघांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या लग्नाबाबत घोषणा केली. शोएब व सना यांनी २० जानेवारीच्या सकाळी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तिसऱ्या लग्नामुळे शोएब मलिकला सोशल मीडियावर बरंच ट्रोलही केलं जातं आहे.
शोएबसह लग्नकरण्याआधी सना जावेदने पाकिस्तानी अभिनेता व गायक उमेर जसवालशी लग्न केले होते. अनेक मालिकांमध्ये दिसलेली सना पाकिस्तानी सिनेविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्रीने ‘रुसवाई’, ‘रोमियो वेड्स हीर’, ‘डर खुदा से’, ‘डंक’, ‘खानी’, ‘ए मुश्त-ए-खाक’, ‘प्यारे अफजल’, ‘काला डोरिया’ या मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. सध्या ती ARY वाहिनीवरील ‘सुकून’ या मालिकेत काम करत आहे.