सध्या संपूर्ण देशभरातून महिलांवर अत्याचार होत असणाऱ्या घटना कानावर पडत आहेत. एकामागोमाग अशा अनेक घटना समोर येत आहेत. पाहायला गेलं तर महिलांची सुरक्षितता आता कमी झाली असल्याचं चित्र दिसत आहे. कोलकाता बलात्कार प्रकरण, बदलापूर लैगिंक अत्याचार अशी विविध प्रकरण कानावर आली. आणि या प्रकारणांनी साऱ्यांना हादरवून सोडले. ही प्रकरण ताजी असतानाच आता आणखी एका धक्कादायक घटनेने साऱ्यांचं लक्ष वेधलं. ही घटना महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे घडली असल्याचं समोर आलं आहे. (Kiran Mane Post)
संबंध देशभरात काही ना काही सुरु असताना आता कोल्हापुरातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील दहा वर्षीय मुलीचा बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. यावर आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. अभिनेते किरण माने यांनी या प्रकरणावर थेट पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलेलं दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने राजकीय पक्षातील मंडळींनाही सवाल केलेला पाहायला मिळत आहे.
किरण माने यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या. शिये गावातील रामनगरची ही मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. नेमके आजच लाडकी बहिणच्या शानदार इव्हेन्टसाठी चीप मिनिस्टर कोल्हापुरात आले आहेत. आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित नसतील तर सूत्र कदाचित वेगात हलतील. नाहीतर पुन्हा तेच. तक्रार न घेणे. पुरावे नष्ट करणे. सुटका नाही”. “लेकींनो या महाराष्ट्रात तुम्ही सुरक्षित नाही”, असे कॅप्शन त्यांनी याखाली दिले आहे.
किरण माने यांच्या सदर पोस्टवर अनेक प्रेक्षक मंडळींनी संताप व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे. अनेकांनी नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा द्या असं म्हटलं आहे. किरण माने यांनी याआधीही अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलेलं पाहायला मिळालं.