Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की वाद हे आलेच. १०० दिवसांचा या स्पर्धकांचा प्रवास या शोमध्ये पाहणं रंजक ठरतोय. यंदाचं हे पाचवं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर रॅपर, गायक, रील स्टार अशी विविध क्षेत्रातील मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेली दिसत आहेत. या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडा करताना दिसत आहेत. हा तुफान राडा कधी कोणाबरोबर आणि कधी होईल हे सांगणं मात्र कठीण. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील आजवरचे तीनही आठवडे स्पर्धकांनी विशेष गावजवले असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वात स्पर्धकांचे दोन गट पडलेले पाहायला मिळतात. टीम ए व टीम बी मध्ये प्रत्येक टास्क दरम्यान तुफान राडा होताना पाहायला मिळत आहे. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरात आणखी एक वाद झाला असल्याचं समोर आलं आहे. हा वाद दोन्ही टीममधील स्पर्धकांमध्ये झालेला पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये आर्या, निक्की व जान्हवी या स्पर्धकांमध्ये वाद झालेला पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुला आताच मारेन”, वैभवची आर्याला धमकी, अंगावर ओरडत राहिला अन्…; हे वागणं शोभतं का?
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून असं कळतंय की, आर्या, निक्की व जान्हवी यांच्यामध्ये अंथरुणावरुन वाद झाला आहे. जान्हवी ‘बिग बॉस’ला सांगते की, “‘बिग बॉस’ मी स्वतःला सांभाळू शकत नाही”. त्यानंतर निक्की आर्याला सांगते, “माझ्या पांघरुणाला हात नको लावू”. तेव्हा आर्या व निक्कीमद्ये झटापट होते. तेव्हा आर्याला निक्की लाथ मारते.
तेव्हा आर्या निक्कीवर ओरडत म्हणते की, मला लाथ नको मारु”. तर इकडे जान्हवी म्हणते, “ही इकडे आता फडफडतेय”. तेव्हा आर्या तिला म्हणते, “मग नको फडफडू”. तर आर्या व निक्की बोलतात तेव्हा निक्की म्हणते, “आता तुझ्या चेहऱ्यावरचे रंगचं उडणार आहेत”, असं म्हणत त्या तोंडाला येईल ते बोलत भांडत राहतात. दरम्यान इतर स्पर्धक मंडळी त्यांचा हा वाद पाहत उभ्या असतात.