सध्या देशभरात इलेक्शनचे वारे वाहू लागले आहेत. मतदान दिनाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा इलेक्शनकडे लागून राहिल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातील इलेक्शनचे स्वरुप काहीसे निराळे असल्याने बऱ्याच जणांना ते पटलेले नाही. महाराष्ट्रात लोकसभा मतदान हे १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे अशा पाच टप्प्यात होणार आहे. या मतदानाचा निकाल ४ जून रोजी घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात होणाऱ्या या मतदानात महाराष्ट्रातील मतदानाच्या वेगळेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Kiran Mane On Election 2024)
बरेच जणांना महाराष्ट्रातील हे मतदानाचे स्वरुप खटकल्याने त्यावर आक्षेप घेण्यास, भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. अशातच सुप्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी मतदानावरुन केलेलं भाष्य लक्ष वेधून घेत आहे. किरण माने यांनी त्यांच्या अभिनयाने आजवर रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याशिवाय विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर ते नेहमीच भाष्य करताना दिसतात. स्पष्टवक्तेपणामुळे किरण माने यांना ओळखले जाते. अशातच किरण माने यांनी लोकसभा निवडणुकावरुन केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे.
“महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक, पण गुजरातमध्ये एकाच टप्प्यात? का? घे की एकाच टप्प्यात हिकडंबी मर्दा. घड्याळवाला अमरिशपुरी, धनुष्यबाणवला प्रेम चोपडा, आणि तुमचा स्वतःचा कवठ्या महांकाळ असतानाबी हिंमत व्हईना व्हय? हे बरोबर नाय राव?”, अशा ग्रामीण भाषेत किरण माने यांनी निवडणुकीला घेऊन लागवलेला टोला चर्चेत आहे. याआधी बरेचदा किरण माने यांनी अनेकदा राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
किरण माने यांची निवडणुकीला घेऊन केलेली ही पोस्ट काहींना पटली आहे तर काहींना पटली नाही. काहींनी या पोस्टला घेऊन नाराजी दर्शविली आहे. तर अनेकांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य न करता अभिनयाकडे लक्ष केंद्रित करा असा सल्लाही किरण माने यांना दिला आहे.