छोट्या पड्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री तितीक्षा तावडे. नुकतीच काही दिवसांपूर्वी या जोडप्याने एकमेकांसह विवाहगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरवात केली आहे. सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या लग्नाच्या तसेच लग्नापूर्वीच्या विधींचेही फोटो सोशल मीडियावर वायरल झालेले पाहायला मिळाले. दोघांनी थेट केळवणाचा फोटो शेअर करत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आणि त्यानंतर ते अखेर लग्नबंधनात अडकले.
सिद्धार्थ-तितीक्षा ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यांचे काही खास फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. लग्नानंतर दोघेही त्यांच्या सुखी सांसाराला लागले आहेत. दोघेही त्यांच्या लग्नानंतर कामात चांगलेच व्यस्त झाले असून ते त्यांच्या वैवाहीक जीवनाचा आनंदही घेत आहेत.

अशातच सिद्धार्थने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आजचा खास बेत शेअर केला आहे. तितीक्षा तावडेने सिद्धार्थसाठी बेत केला असल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे. ज्यात भात, आमटी, कांदा, लिंबू, काकडी तसेच खास भाजी असे अनेक पदार्थ पाहायला मिळत आहे. हा खास फोटो शेअर करत सिद्धार्थने तितीक्षाला टॅग केले आहे. तसेच या खास बेतासाठी तिला “धन्यवाद बायको” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम एल्विश यादवला अटक, पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांची कारवाई
दरम्यान, लग्नानंतर सिद्धार्थ व तितीक्षा त्यांच्या कामात व्यस्त झाले आहेत. अभिनेत्री सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेले काही दिवस ती मालिकेत दिसत नसल्यामुळे चाहत्यांकडून निराशा व्यक्त केली जात होती. मात्र ती लवकरच या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
तसेच सिद्धार्थ हा नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या मराठी चित्रपटात झळकला होता. यानंतर तो लवकरच जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याचे अनेक चाहते मंडळी यासाथी उत्सुक आहेत.