सौंदर्य व अभिनय या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत एका मराठमोळ्या अभिनेत्रीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने सिनेसृष्टीमध्ये छाप पाडली. याशिवाय पन्नाशी ओलांडलेल्या या अभिनेत्रीच्या सौंदर्यांने तर साऱ्यांनाच भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडली. ऐश्वर्या यांनी त्यांचे पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट करत असतात. (Aishwarya Narkar Answers To Trollers)
विविध ट्रेंडिंग रील्सवर व्हिडीओ बनवत बरेचदा ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. ट्रेंडिंग रीलवर व्हिडीओ बनवल्याने अभिनेत्रीला ट्रोल केले आहे मात्र या ट्रोलिंगला न जुमानता प्रत्येकवेळी सडेतोड उत्तर देताना दिसतात. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने तिच्या रविवारच्या दिनक्रमाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सकाळचा चहा बनवण्यापासून त्यांची रविवारची सकाळ सुरु होते. हा रविवारचा सुट्टीचा दिवस त्या कशा घालवतात याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. सकाळच्या चहापासून झालेली सुरुवात ते झाडांना पाणी घालणे, त्यांची काळजी घेणे याशिवाय त्यांच्याजवळ असलेल्या पाळीव मांजरीची त्या खेळतानाही व्हिडीओमध्ये दिसल्या.
या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांच्या सुंदर, नीटनेटक्या घराचीही झलक पाहायला मिळाली. शोपीस, तसेच घरात अनेक विविध प्रकारची झाडे पाहायला मिळाली. या व्हिडीओमध्ये त्या त्यांच्या या सुंदर अशा घराची काळजी घेताना दिसल्या. ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केलेल्याही पाहायला मिळत आहेत. दरम्यान एका चाहत्याने गमतीत ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. “सुंदर, पण तो पाण्याचा नळ जरा चमकवा, मिस्टर मसलने साफ होईल”, असं म्हटलं आहे. यावर ऐश्वर्या यांनी अत्यंत नम्रतेने या चाहत्याला कमेंट करत, “हा चमकणारा नळ नाही आहे, हा नळ अँटिक आहे”, असं म्हटलं आहे.