मराठी मनोरंजन सृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने पूजाने अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा ही तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली आहे.
पूजा व सिद्धेशच्या शाही विवाहसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजा व सिद्धेशने बॉलिवूड स्टाईलने लग्नसोहळा उरकत साऱ्यांच्या नजर वळविल्या. मात्र दोघांनी मराठमोळी परंपराही यावेळी जपली. पूजा व सिद्धेश याच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोही चर्चेत राहिले. हळदी, संगीत सोहळ्यांमधील त्यांची धमाल, मस्तीही पाहायला मिळाली. लग्नानंतर पूजा आपल्या संसारात चांगलीच रमलेली पाहायला मिळत आहे.
लग्नानंतर पूजा व सिद्धेश ही जोडी ऑस्ट्रेलियाला गेली असून दोघेही लग्नानंतच्या खास क्षणांचा आनंद घेत आहेत. पूजा व सिद्धेश दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे त्यांनी आपल्या लग्नाचे खास फोटो शेअर केले होते. अशातच त्यांच्याअ नवीन फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी सिद्धेशबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाचा बोल्ड लुकही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम एल्विश यादवला अटक, पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांची कारवाई
दरम्यान, पूजा व सिद्धेशच्या हळदी, संगीत व लग्न समारंभाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अशातच त्यांच्या या फोटोंनीही साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच त्यांनी शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनीदेखील लाईक्स् व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी त्यांच्या या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.