मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा म्हणून अभिनेते किरण मानेंची ओळख आहे. किरण यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेत विलास पाटील यांची भूमिका साकारली, जो प्रेक्षकांना विशेष आवडला होता. मात्र, मालिकेदरम्यान किरण यांचे मालिकेतील कलाकारांशी झालेल्या मतभेदामुळे अखेर त्यांनी ही मालिका सोडली. पुढे ते ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले, आणि आपल्या दमदार खेळीच्या जोरावर ते टॉप ५ पर्यंत पोहोचले. (Kiran Mane Facebook post)
अभिनेते किरण माने एका विशेष कारणाने चर्चेत राहतात, ते म्हणजे त्यांचे सोशल मीडियावरील पोस्ट. समाजात घडणाऱ्या विविध मुद्द्यांवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड मत व्यक्त करतात. त्यांच्या त्या पोस्टची सर्वच माध्यमांत नेहमीच चर्चा होते. अशातच किरण यांची एक पोस्ट नुकतीच झाली आहे. ज्यात त्यांनी एक मीम शेअर केला आहे. या मीममध्ये सामाजिक मुद्द्यावर परखड मत मांडलं आहे.
हे देखील वाचा – ”त्यांच्या खूप गोष्टी खटकतात आणि…”, नवऱ्याच्या खुपणाऱ्या गोष्टींवर अमृता खानविलकरचं भाष्य, म्हणाली, “त्यांचे वडील गेल्यानंतर…”
किरण माने यांनी शेअर केलेल्या मीममध्ये ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामधला एक सीन आहे. ज्यात पोलीस स्टेशनमधील जोकर आणि बॅटमॅनच्या संवादाचा हा सीन आहे. या मीममध्ये तो जोकर सांगतोय की, ‘पुन्हा सांगतो लक्षात घे. भारतात मुस्लिम आहे म्हणून तुम्ही हिंदू आहात; नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातींचे राहणार.’ हे मीम शेअर करत किरण माने यांनी कॅप्शन देत लिहिलंय, “…हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा, विचार करा. लब्यू जितेंद्र रायकर.” त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा – Video : “नाटकांच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण…”, अमृताचा प्रसादसाठी खास उखाणा, आजोबांनी नातीचं केलं थाटात केळवण

नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारताना दिसत आहे.