प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जे आपलं आयुष्य बदलायला कारणीभूत ठरतात. त्या क्षणांमुळे आपलं आयुष्य एकतर बदलतं नाहीतर बिघडतं. असाच एक अनुभव अभिनेता जितेंद्र जोशी याने गायक अवधुत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सांगितला. या कार्यक्रमात विविध कलाकार मंडळी हजेरी लावतात. अवधुत या कार्यक्रमात विविध प्रश्न विचारून कलाकारांची पोल खोल करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर तो त्यांच्या आयुष्यातील विविध टप्पे जाणून घेत असतो. नुकताच त्याच्या कार्यक्रमात अभिनेता जितेंद्र जोशी सहभागी झाला होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच अभिनय क्षेत्राबद्दलही त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले.(Jitendra Joshi shared a struggle story)
अवधुतने जितेंद्रला असा प्रश्न केला की, अशी कोणती अशी गोष्ट आहे ज्यामुळे जितेंद्र जोशीचं आयुष्य बदललं. त्यावर जितेंद्र म्हणाला, “मी मुंबईमध्ये आलो. ‘३ चिअर्स’ हे मला पहिलं नाटक मिळालं. त्यानंतर सात महिने माझ्याकडे कोणतही काम नव्हतं. त्यानंतर एकदा तिकिट न काढताच मी पुण्यामध्ये पोहोचलो. आम्ही मामाच्या घरामधून वेगळे झालो होतो. पुण्यामध्ये वेगळे राहायला लागलो. एक ते दीड वर्ष झाल्यानंतर मी आईला म्हटलं की, आई याक्षेत्रात माझं काहीच होत नाही. उपाशी राहत आहे, खायला पैसे नाहीत”.
वाचा – काय सांगितलं आईने जितेंद्रला ?(Jitendra Joshi shared a struggle story)
त्यानंतर पुढे तो म्हणाला,“आईने मला जेवण दिलं आणि म्हणाली, भांडून गेला आहेस ना तर आता तिथेच राहायचं. हिम्मत असेल तर मलाही तिथे घेऊन जायचं. पण तू इथे परत यायचं नाही. जे काही करायचं आहे ते तिथे मुंबईत कर. काम हाती नसतानाचे जे काही सात महिने होते त्या सात महिन्यांनी मला खूप बदललं”.
जितेंद्रने आजवर चित्रपट, नाटकात काम केलं आहे. पण त्याच्या आयुष्यातील त्याने सांगितलेला हा क्षण त्याला स्वतःलाच घडवून गेला. अलिकडेच त्याच्या गोदावरी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याने आजवर ‘काकण’, ‘गोदावरी’, ‘चोरीचा मामला’ सारखे चित्रपटही केले.