शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एक पार्टी १५०० देतेय, दुसरी ३००० देणार म्हणतेय”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाले, “आपल्या टोल आणि टॅक्समधून…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 17, 2024 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actor Dr Girish Oak shared a social media post regarding Ladki Bahin Yojana and Mahalakshmi Yojana.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट चर्चेत, म्हणाले...

प्रचाराचं मैदान असो किंवा सोशल मीडियावरुन ठरावीक पक्षांना मतदान करण्यासाठी केलेलं आवाहन असो… मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सध्याच्या आजूबाजूच्या राजकीय प्रश्नांवर आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. मतदानाला अवघे चार दिवस उरले आहेत आणि या निवडणुकीच्या लढतीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख सहा पक्षांची लढत होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यासह विविध आश्वासनंही दिली जात आहेत. याच आश्वसनांवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांनी एक खोचक पोस्ट शेअर केली आहे. (Dr. Girish Oak Political Post)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. गिरीश ओक यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून त्यांनी ‘भाबडे’ प्रश्न विचारले आहेत. डॉ. गिरीश ओक यांनी विधानसभेबाहेरचा सेल्फी फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “मला पडलेले दोन भाबडे प्रश्न…पहिला…एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000 देणार म्हणतेय इतरही बरीच पैश्याची आश्वासनं दिली जातायत..पण  हे देतायत/देणार कुठून आपल्या टोल,आयकर,जीएसटी मधूनच ना ?मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी”. 

आणखी वाचा – स्टार प्रवाहवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ मालिका घेणार का प्रेक्षकांचा निरोप?

यापुढे त्यांनी म्हटलं की, दुसरा प्रश्न… आणि हे जे एटीएमच्या किंवा इतर गाड्यांमधे पैसे पकडले जात आहेत, ते असे विषम संख्येत म्हणजे १ कोटी २७ लाख किंवा २ कोटी ७० लाख असे कसे आहेत. देणाराही असे का देत आहे आणि घेणाऱ्यालाही असे कसे हवे आहेत. की हे वरचे पैसे म्हणजे पोचवणाऱ्यांचा पोचवण्याचा मेहनातीला आहेत की पोचवताना ते पोचवणारेच लंपास करत आहेत किंवा पकडणारे थोडे लंपास करून उरलेलेच सापडले असं सांगत आहेत? मला कोणी सांगेल का?”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मालिकेच्या सेटवर अपघात, रुग्णालयात केलं भरती, आता कशी आहे परिस्थिती?

दरम्यान, यंदाच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात गाजलेला मुद्दा म्हणजे सरकारची लाडकी बहिण योजना. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महायुतीच्या सरकारने १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या याच निर्णयाला आव्हान देत विरोधकांनी महिलांसाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा करत दर महिन्याला ३००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याच सगळ्यावर डॉ. गिरीश ओक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं म्हणणं पटलं असल्याचंही म्हटलं आहे. 

Tags: Dr. Girish Oak Political PostDr. Girish Oak Post on Ladki Bahin YojanaDr. Girish Oak Post on Mahalaxmi Yojana
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Sarod player Ashish Khan passed away at the age of 84 and breathed his last in Los Angeles, USA

प्रसिद्ध सरोद वादक आशिष खान यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.